Gulam Nabi Azad & Sonia Gandhi esakal
देश

Congress: गुलाम नबी आझाद यांनी दिला काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याचे कारण अस्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची याच दिवशी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे.

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याच्या कारणाबाबत स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही महत्त्वाची जबाबदारी 47 वर्षीय वानी आणि 73 वर्षीय ज्येष्ठ नेते आझाद यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून दिली होती. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, सोनिया गांधी यांनी जम्मू आणि काश्मीर काँग्रेस समितीसाठी निवडणूक प्रचार समिती आणि राजकीय व्यवहार समिती (पीएसी) यासह सात समित्याही स्थापन केल्या होत्या.

वेणुगोपाल म्हणाले होते की, सोनियांनी गुलाम अहमद मीर यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांच्या जागी रसूल वानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. आझाद यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वानी हे राज्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि बानिहालचे आमदार आहेत.

आझाद हे काँग्रेसच्या जी 23 गटाचे प्रमुख सदस्य आहेत. या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेस हायकमांड आणि आझाद यांच्यातील संबंध सुधारल्याचे मानले जात होते. आझाद यांनी 15 ऑगस्ट रोजी राहुल गांधींसोबत 'आझादी गौरव यात्रे'मध्येही भाग घेतला होता, मात्र त्याचदरम्यान त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

Hingoli Traffic Congestion: हिंगोलीकरांची वाहतूक व्यथा: कोंडी, पार्किंग नसणे आणि धूळखात सिग्नल; गांधी चौक ते रिसाला बाजार

SCROLL FOR NEXT