देश

Video: "Activa च्या मालकाला Z+ सुरक्षा", कोब्रा नागाने स्कूटीमध्येच केला घरोबा

सकाळ डिजिटल टीम

स्कूटीच्या आत लपून बसलेल्या कोब्रा नागाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने कोब्रा साप बाहेर काढताना दिसत आहे. ( giant cobra snake news in Marathi)

अविनाश यादव (@avinashyadav_26) यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अविनाशच्या इंस्टाग्राम बायोनुसार, तो एक सर्पमित्र आहे. अविनाश नियमितपणे सापांच्या विविध प्रजातींबद्दल मनोरंजक पोस्ट शेअर करत असतो. त्याने यापूर्वीही अनेक साप पकडले आहेत.

हेही वाचा भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

अविनाशने ज्या पद्धतीने अ‍ॅक्टिव्हा स्कूटीमधून साप बाहेर काढला, ते खरोखरच धाडसाचे होते. कारण त्याच्या हातात साप पकडण्यासाठी काठीही नव्हती. अविनाशने व्हिडिओमध्येच सांगितले की, हे रेस्क्यू ऑपरेशन पहाटे 5 वाजता आहे. अविनाशने ऑक्टोबरमध्ये हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अविनाशने गंमतीने लिहिले की Activa च्या मालकाला Z+ सुरक्षा मिळाली आहे.

पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा स्कूटीच्या पुढच्या भागात कोब्रा साप लपून बसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यानंतर समोरचा भाग उघडून सापाला बाहेर काढण्यात आले. अविनाशच्या हातात स्क्रू ड्रायव्हरही दिसतो, त्याचा वापर त्याने स्कूटी समोरून उघडण्यासाठी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला मोठा धक्का! अन्नामलाईंनंतर आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ, 'या' पक्षात करणार प्रवेश...

Mumbai Traffic: मुंबईकरांसाठी मोठा बदल! BKC मध्ये कार आणि बाईकला दर शुक्रवारी प्रवेशबंदी; कठोर नियमाचं कारण काय?

Pune Crime: बिबवेवाडीत डिलिव्हरी बॉयला धमकावून मारहाण; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोघे अटकेत

IND vs AFG, ODI : रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? त्या Viral Video मुळे मिळालं स्पष्ट उत्तर

Pachod Crime : अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या आठ चालक मालकाविरुद्ध गुन्हा; वाळूसह सव्वा तेहतीस लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT