देश

बोर्डिंग स्कूल परिसरात विद्यार्थिनीवर अत्याचार 

पीटीआय

डेहराडून : साहसपूर येथील बोर्डिंग स्कूल परिसरात चार विद्यार्थ्यांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना महिनाभरानंतर उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी विद्यार्थ्यांसह नऊ जणांना अटक केली आहे. हा प्रकार 14 ऑगस्ट रोजी घडला असून आरोपी छात्र, मोलकरीण आणि शाळा व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांसह नऊ जणांना अटक केली. 

आरोपी विद्यार्थ्यांत दहावी आणि बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यांचे वय 16 ते 18 सांगितले जात आहे. शाळेच्या संचालिका लता गुप्ता, प्राचार्य जितेंद्र शर्मा, प्रशासकीय अधिकारी दीपक मल्होत्रा, त्यांची पत्नी तनू मल्होत्रा आणि मोलकरीण मंजू यांचा आरोपींत समावेश आहे. पीडित मुलगी दहावीत शिकत असून, ती गर्भवती राहिल्यानंतर तिने ही बाब बोर्डिंग स्कूलमध्येच असणारी बहीण आणि नातेवाइकाला सांगितली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौदा ऑगस्ट रोजी एका वर्गमित्राने पीडित मुलीला, सरांनी बोलावले असल्याचे सांगत वसतिगृहामागे नेले. तेथे अगोदरच आणखी एक वर्गमित्र आणि मोठ्या वर्गातील दोन विद्यार्थी होते. त्यांनी पीडितेवर अत्याचार केला. हा प्रकार तिने शाळा व्यवस्थापनाला सांगितला असता, तिला धमकावून गप्प केले.

काही दिवसांनी तिची तब्येत ढासळली आणि ती गर्भवती असल्याचे निदान झाले. व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी तिचा गर्भपात करण्याचादेखील प्रयत्न केला, मात्र तिने हा प्रकार डेहराडून येथील नातेवाइकांना सांगितला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT