Marriage eSakal
देश

Belgaum : प्रियकरानं लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; सहा वर्षांपासून होते प्रेमसंबंध

लग्नास (Marriage) टाळाटाळ केल्याने युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या सहा वर्षांपासून शशिकला त्याला लग्नासाठी वारंवार विचारणा करत होती.

बेळगाव : लग्नास (Marriage) टाळाटाळ केल्याने युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.१३) मृत्यू झाला. शशिकला मुरलीधर पम्मार (वय २८, रा. कलमड डीएलटी, ता. रामदुर्ग, सध्या रा. द्वारकानगर, बेळगाव) असे तिचे नाव आहे.

याप्रकरणी प्रियकराविरोधात टिळकवाडी पोलिस (Tilakwadi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शशिकलाचे राजशेखर हणमंत जराळे (वय ४०, रा. विजापूर) याच्याशी प्रेमसंबंध होते. गेल्या सहा वर्षांपासून शशिकला त्याला लग्नासाठी वारंवार विचारणा करत होती. मात्र, तो त्यास टाळाटाळ करत असल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले होते.

त्यामुळे तिला ११ ऑक्टोबर रोजी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार घेऊन बरे झाल्यानंतर १२ ऑक्टोबरला राजशेखरला घरी बोलावून घेतले. मात्र, शशिकला व राजशेखर यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. त्यामुळे नैराश्यातून शशिकलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

Sugar Export Ban: निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट: हर्षवर्धन पाटील यांची माहिती; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार!

SCROLL FOR NEXT