girlfriend reaches home and leaves him after seeing the hut at uttar pradesh 
देश

प्रेयसीने ते पाहिले अन् म्हणाली आपले लग्न झालंच नाही...

वृत्तसंस्था

वाराणसी (उत्तर प्रदेश): एका युवतीने नोकरासोबत पळून जाऊन मंदिरामध्ये विवाह केला. विवाहानंतर घरी गेल्यानंतर तिला धक्काच बसला. काही वेळातच तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला आणि पोलिस चौकी गाठली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरापूर येथील एक युवक फतेहपूर येथील एका व्यक्तीकडे काम करत होता. मालकाला एक मुलगी होती. मुलगी आणि नोकरामध्ये ओळख निर्माण झाली. त्याने आपण खूप श्रीमंत असल्याचे सांगून मोबाईलवर घराचे खोटे छायाचित्र दाखवले. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. एक दिवस दोघांनी पळून जाऊन विवाह करण्याचे ठरवले. मंदिरात जाऊन विवाह केला आणि तो तिला घरी घेऊन गेला. मात्र, घरी गेल्यानंतर युवतील धक्काच बसला. मोठ्या घराऐवजी एक छोटी झोपडी होती. तिने तत्काळ याबाबतची माहिती घरी कळवली. कुटुंबियांनी तिला पोलिस चौकीत यायला सांगितले. काही वेळातच युवती व तिचे कुटुंबिय चौकीत आले.  येथे आल्यानंतर युवतीच्या हातामधील बांगड्या काढण्याबरोबरच सिंदूर पुसून काढला आणि विवाह झालाच नसल्याचे सांगितले. याबाबत कोणाचीही तक्रार दाखल झालेली नाही.

युवती चौकीतच युवकाला म्हणाली, तू मला खोटी माहिती देवून विवाह करायला लावला. पण, तुझे घर पाहिल्यानंतर मला धक्का बसला. तू जसे मला फसवले तसे मी सुद्धा तुला फसवले. आपला विवाहच झालेला नाही असे सांगून आई-वडिलांसोबत घरी गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT