

डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.