Crime Sakal
देश

चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षीय मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य

माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मुलीची सुटका केली

सकाळ डिजिटल टीम

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये वृद्धाने तीन वर्षांच्या मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य (Girls molestation) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशोका गार्डन पोलिस ठाण्याचे प्रभारी आलोक श्रीवास्तव यांनी गुरुवारी सांगितले की, बुधवारी अशोका गार्डन पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली.

तक्रारदाराची मुलगी घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी वस्तीत राहणाऱ्या ५९ वर्षीय आरोपीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून जवळच्या स्टॉलवर नेले. हात ओढून तिला गाडीत नेऊन अनैसर्गिक कृत्य (Girls molestation) केले. याचदरम्यान गायत्री भास्कर (३०) या महिलेने त्यांना पाहिले आणि गोंधळ घातला. त्यानंतर काही लोकही तेथे जमा झाले, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.

जमलेल्या नागरिकांपैकी एकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मुलीची सुटका केली आणि आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने यापूर्वी दोन-तीन वेळा परिसरातील अल्पवयीन मुलींसोबत (Girls molestation) असे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, लोकांच्या लज्जेच्या भीतीने कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Abu Salem : सुप्रीम कोर्टाने अबू सालेमला फटकारले, याचिक रद्द करत म्हटले- " टाडा अंतर्गत सजा मिळालीय, समाजाचं भल केलं म्हणून नाही"

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

Latest Marathi News Update : पुण्यातील भाजपा आणि काँग्रेस राडा प्रकरण; धीरज घाटे रवींद्र चव्हाणांना भेटणार

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

SCROLL FOR NEXT