Prime Minister Narendra Modi esakal
देश

'PM मोदी जीन्स घालणाऱ्या मुलींना आवडत नाहीत' काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

गोमांस खाणं वाईट नाही असं सावरकरांनी म्हटल्याचंही वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay SIngh) हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी मोदींबद्दल (PM Narendra Modi) वादग्रस्त असं वक्तव्य केलं आहे. मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) एका कार्यक्रमात ते बोलत होते. प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या 'लडकी हूँ, लढ सकती हूँ' या घोषणेबाबत बोलताना दिग्विजय सिंह म्णाले की, पंतप्रधान मोदी हे जीन्स घालणाऱ्या मुलींना आवडत नाहीत. तर त्यांचा प्रभाव फक्त ४० वर्षांवरील महिलांवर आहे.

दिग्विजय सिंह हे जन जागरण मोहिमे अंतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, जीन्स घालणाऱ्या मुली आणि फोन असणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत. फक्त ४० ते ५० वयाच्या महिलांवर मोदींचा प्रभाव आहे. तसंच भाजपला २०२४ मध्ये पुन्हा सत्ता मिळाली तर भारताची राज्यघटना बदलली जाईल, आरक्षण संपुष्टात येईल असंही दिग्विजय सिंह यांनी म्हटलं.

गोमांस खाण्याबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, 'काही हिंदू गोमांस खातात आणि काही खात नाहीत. काहीजण गोहत्येच्या विरोधात आहेत. पण, स्वतः सावरकरांनी (Sawarkar) आपल्या पुस्तकात लिहिलंय, की हिंदू धर्माचा हिंदूत्वासोबत संबंध नाही. गाय स्वतःच्या मल-मुत्रामध्ये लोळतेय तर ती आपली माता कशी काय होऊ शकते? गोमांस खाणं वाईट नाही, असं स्वतः सावरकरांनी म्हटलंय. सध्या भाजप त्यांच्याच विचारावर चालत असल्याचंही दिग्विजय सिंह यांनी याच कार्यक्रमात म्हटलं होतं.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपचं हिंदूत्व ढोंगी आहे. हिंदूत्ववाद्यांमुळे देशाला, देशाच्या एकात्मेला धोका आहे असा आरोप केला होता. त्यावर बोलताना दिग्विजय सिंह यांनी सावरकरांच्या विचारांचा दाखला देत भाजपला हिंदूत्वावरून डिवचलं आहे. भाजप आणि आरएसएस सावरकरांना मानतात. पण, स्वतः सावरकरांनी हिंदू आणि हिंदूत्व या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचं आपल्या पुस्तकामध्ये लिहिल्याचं दिग्विजय सिंह यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT