Narendra Modi
Narendra Modi Sakal
देश

गावांमध्ये घरोघरी जाऊन चाचण्या वाढवा : नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाची (Coronavirus) दुसरी लाट (Second Wave) ग्रामीण भागांमध्ये (Rural Area) पोचल्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज गावांमध्ये (Village) घरोघरी जाऊन वेगाने कोरोना चाचण्या (Corona Test) करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. अनेक ठिकाणांवर केंद्राने पाठविलेले प्राणरक्षक व्हेंटिलेटर धूळ खात पडून असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत ऑडिटचेही (Audit) निर्देश दिले. पंतप्रधानांनी आज व्हर्च्युअल बैठकीमध्ये देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. (Go door to door in the villages and increase the tests Narendra Modi)

रोज किती चाचण्या केल्या? याची आकडेवारी किती असावी? याबाबत राज्यांवर दबाव न आणता त्याचे आकडे पारदर्शकपणे केंद्राकडे पाठविण्यासाठी राज्यांच्या यंत्रणांना तुम्हीच प्रोत्साहित करा, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केंद्रीय अधिकाऱ्यांना केली. कोरोनाच्या संसर्गाबरोबरच देशातील लसीकरण मोहिमेचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्राने सुरू केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्यांना ‘पीएम केअर्स’ निधीतून पाठविण्यात येणारे शेकडो व्हेंटिलेटर धूळखात पडून आहेत आणि अनेक ठिकाणी ते नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आहेत. या सर्व प्रकाराबद्दल पंतप्रधानांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि व्हेंटिलेटरचा उपयोग राज्यांनी अवश्य केला पाहिजे असे बजावले. यात काही तांत्रिक अडचणी आल्या तर केंद्राबरोबर राज्यांचे अधिकारी कधीही संपर्क साधू शकता असेही ते म्हणाले.

संसर्ग कमी होतोय

देशाच्या अनेक भागांमध्ये सातत्याने संसर्गाचा दर कमी होत असल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. आरोग्य कर्मचारी, राज्य सरकारे तसेच केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमधून अनेक भागांमध्ये संसर्गाची तीव्रता कमी झाल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांनी या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करतानाच ग्रामीण भागात चाचण्या वाढवण्याच्या गरजेवर भर दिला.

रुग्ण कमी व्हावेत

विशेषतः ग्रामीण भागात घरोघरी जाऊन चाचण्यांची संख्या वाढवा असे निर्देश मोदींनी दिले आहेत. यासाठी अंगणवाडी आणि आशा सेविकांची मदत घ्या, त्यांचे रीतसर प्रशिक्षण करा, असेही ते यावेळी म्हणाले. याबरोबरच जिथे संसर्ग वाढलेला असेल तिथे आरटीपीसीआर आणि अँटिजेन अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्यांवर भर द्यावा अशी सूचना त्यांनी केली. मागील काही आठवडे किंवा महिने एकही रुग्ण न आढळणाऱ्या जिल्ह्यांच्या संख्येत वाढ कशी होईल? याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

विस्तृत सादरीकरण

ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या सूचनेवर उपस्थित उच्चपदस्थांकडून माहिती सादर करण्यात आली. सुरवातीला देशात दर आठवड्याला ५० लाख चाचण्या व्हायच्या. ही संख्या सध्या दीड कोटीपर्यंत गेली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. देशव्यापी संसर्गाबाबतचे एक विस्तृत सादरीकरणही पंतप्रधानांसमोर करण्यात आले.

देशातील संसर्ग स्थिरावतोय - पॉल

देशातील कोरोनाचा संसर्ग आता स्थिरावत चालला असून यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून देखील सरकारचे काम सुरू राहील, असे मत नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी मांडले. आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.यावेळी मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल देखील उपस्थित होते.

  • व्हेंटिलेटर, उपकरणे हाताळण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या

  • आशाताई, अंगणवाडी सेविकांना आवश्‍यक साधनांचा पुरवठा करा

  • ग्रामीण भागांत ऑक्सिजनचे योग्य वितरण होणे गरजेचे

  • राज्यांनी खरी आकडेवारी द्यावी म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले जावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT