high court sakal
देश

'गरज असेल तरच बाहेर पड', उन्नाव बलात्कार पीडितेला न्यायालयाचा आदेश

सकाळ डिजिटल टीम

उन्नाव बलात्कार पीडितेच्या एका याचिकेवर सुनावणीवेळी दिल्लीतील न्यायालायने तिला घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली - उन्नाव बलात्कार पीडितेच्या एका याचिकेवर सुनावणीवेळी दिल्लीतील न्यायालायने तिला घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे. न्यायालयाने पीडितेला सुनावणी होईपर्यंत फक्त गरज असेल तरच बाहेर पडावं असं सांगितलं आहे. तसंच कुठे जाण्याआधी आपल्या खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आदेशही दिले आहेत. उन्नाव बलात्कार पीडितेला सीआरपीएफची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. हे आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी दिले आहेत.

उन्नवाव बलात्कार पीडितेनं न्यायालाय याचिका दाखल करताना सुरक्षा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. यानंतर न्यायालयाने आदेश दिले आहेत. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी म्हटले की, कुठेही जाण्याआधी सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती द्या. त्यांना तुमच्या सुरक्षेसाठी तैनात केलं आहे. तुम्हाला असं नियोजन करायला हवं की दर दिवशी बाहेर पडायला लागू नये. गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा. हे प्रकरण संपेपर्यंत तुम्हाला काळजी घ्यायला हवी.

न्यायालयाने म्हटलं की, बलात्कार पीडिता आणि तिच्या सुरक्षा रक्षकांमध्ये या मुद्द्यावर एकमत झालं आहे. तसंच जर पीडिता किंवा तिच्या कुटुंबातील इतर कोणी या प्रकरणी वकिलांना भेटू इच्छित असतील तर त्यासाठी एक दिवस आधीच माहिती देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असंही सांगितलं आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर तुरुंगात आहेत. त्यांनी तरुणीचे 2017 मध्ये अपहरण करून बलात्कार केला होता. त्यावेळी तरुणी अल्पवयीन होती. सेंगर यांना या प्रकरणी 20 डिसेंबर 2019 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याशिवाय न्यायालयाने 2019 मध्ये बलात्कार पीडिता, तिचे कुटुंबियांना सीआरपीएफ सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT