Goa Congress
Goa Congress 
देश

Goa: काँग्रेस प्रमुखाचा आमदारकीचा राजीनामा; विधानसभेत आता दोनच सदस्य

सकाळ डिजिटल टीम

पणजी: गोवा विधानसभेची निवडणूक (Goa Assembly Election 2022) तोंडावर आलेली आहे. अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीपूर्वीच अनेक राजकीय हालचाली घडताना पहायला मिळत आहेत. या छोट्या राज्यावर आपली सत्ता स्थापन करता यावी, यासाठी इतर अनेक पक्षही कंबर कसून तयार झाले आहेत. आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) तसेच तृणमूल काँग्रेस पक्षाने (TMC) या ठिकाणी आपलं बस्तान बसवण्यासाठी हालचाली सुरु केलेल्या असताना एकेकाळी सत्ता असलेल्या काँग्रेसमध्ये (Congress) मात्र सगळं आलबेल असल्याचं चित्र नाहीये. आज गोवा काँग्रेसला (Goa Congress) आणखी एक धक्का बसलेला पहायला मिळाला.

काँग्रेसचे आमदार अलेक्सो रेजिनाल्ड (Congress MLA Aleixo Reginaldo) यांनी आज विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. अलेक्सो आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे गोवा विधानसभेमध्ये आता काँग्रेसचे दोनच आमदार उरले आहेत. तसेच आमदार प्रतापसिंह राणे हे देखील काँग्रेसच्या तिकिटावर आगामी निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे, असं बोललं जातंय.

अलेक्सो यांनी गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्याकडे त्यांनी आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आठ उमेदवारांपैकी ते एक होते. आता काँग्रेसकडे फक्त दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि प्रतापसिंग राणे हे दोनच आमदार उरले आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे संख्याबळ 2 इतके कमी झाले असून 40 सदस्यीय गोवा विधानसभेचे संख्याबळ 34 वर पोहोचले आहे. आतापर्यंत सहा आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यात काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचा समावेश आहे. भाजप आणि एक अपक्षाचा देखील यामध्ये समावेश आहे. रेजिनाल्ड हे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष होण्याआधी 'आप'शी जोडले गेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon case: भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर

CM Eknath Shinde: महाराष्ट्रात सभा घेतल्या पण मराठा आरक्षणाबद्दल PM मोदी का बोलले नाहीत? CM शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Ghatkopar Hoarding Collapse: भावेश भिंडे कोणाचा पार्टनर? घाटकोपरच्या दुर्घटनेवरून नितेश राणे यांचे गंभीर आरोप

Marathi News Live Update: भावेश भिंडेला फरार घोषित करा; मुंबई होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी किरीट सोमय्यांची मागणी

Viral Video: 'अदित्य ठाकरे, गॅस सिलिंडरला मत द्या,' वंचित'च्या कार्यकर्त्यांचे आवाहन; पुढे काय झाले पाहा

SCROLL FOR NEXT