Utpal Parrikar Decision Goa Election 2022 Sakal
देश

उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार, की केजरीवालांची ऑफर स्वीकारणार? लवकरच स्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

पणजी : भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) ३४ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, यामध्ये गोव्यातील दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना तिकीट देण्यात आलं नाही. त्यानंतर उत्पल हे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहे. ते केजरीवालांची ऑफर स्वीकारतात की अपक्ष लढण्याचा निर्णय घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मी आज पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळी गोवा विधानसभा निवडणुकीबाबत मी माझी भूमिका मांडणार आहे, अशी माहिती उत्पल पर्रीकर यांनी एएनआयला दिली आहे. त्यामुळे आता उत्पल काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केजरीवालांनी दिली ऑफर? -

दिल्लीचे मुख्मंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच गोव्यात पाऊल ठेवले आहे. केजरीवाल हे गोव्यात घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. तसेच भाजपने उत्पल पर्रीकर यांना तिकीट दिले नाही. त्यानंतर त्यांनी उत्पल आपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत आहे, अशी खुली ऑफर केजरीवालांनी दिली. आता उत्पल ही ऑफर स्वीकारतात का? हे पाहणे देखील महत्वाचे आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? -

गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये उत्पल पर्रीकरांना पणजीतून उमेदवारी हवी होती तिथून काँग्रेसमधून आलेल्या मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. तसेच उत्पल यांना दोन वेगळ्या ठिकाणाहून ऑफर दिली होती. मात्र, ती त्यांनी नाकारली. पण, त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT