Utpal Parrikar_Devendra Fadnvis 
देश

उत्पल पर्रिकरांचा भाजपमधून काढता पाय; दिला सदस्यत्वाचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

पणजी : दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा आज शुक्रवारी केली. तसेच त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला आहे. तसेच राज्य कार्यकारिणी सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. पणजी (Panaji) मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने उत्पल पर्रीकर आम आदमी पक्षात जाऊ शकता, अशी चर्चा सुरू होती. मात्र, उत्पल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ज्यामध्ये उत्पल यांचे नाव नव्हते. (Goa Assembly elections 2022)

यादी जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले होते, पण पणजी मतदारसंघातील विद्यमान आमदाराला तिकीट नाकारता येणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. गोव्यातील भाजपचे दिग्गज नेते मनोहर पर्रीकर यांचे २०१९ मध्ये निधन झाले. सुमारे २५ वर्षांपासून पर्रीकर यांच्या ताब्यात असलेल्या पणजी मतदारसंघातून भाजपने अतानासिओ मोन्सेरेट ‘बाबुश’ यांना उमेदवारी दिली आहे.

पणजीमधून उत्पल यांना उमेदवारी न देण्याच्या निर्णयाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे गोवा राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी, “आमच्या पक्षासाठी पर्रीकर कुटुंब हे नेहमीच आमचे कुटुंब आहे. पण उत्पल यांना त्या जागेवरून निवडणूक लढवायची होती. लढण्यासाठी, आमच्याकडे आधीच विद्यमान आमदार आहे आणि विद्यमान आमदाराला वगळणे योग्य होणार नाही. मात्र, आम्ही त्यांना इतर दोन जागांवर लढण्याचा पर्याय दिला होता आणि त्या दिशेने चर्चा सुरू आहे,” असे म्हटले होते.

दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्पल यांना आपचे तिकीट देऊ केले होते. ट्विटरवरून केजरीवाल यांनी भाजपवर टीका करत, “त्यांनी पर्रीकर कुटुंबासोबतही वापरा आणि फेकण्याचे धोरण स्वीकारले आहे, म्हणून आपने उत्पल यांना ‘आप’च्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची संधी आहे,” असे म्हटले होते.

गेल्यावेळीही लोकांचे समर्थन असतानाही पक्षाने काही विशिष्ट कारणांमुळे मला तिकीट नाकारले होते. तेव्हापण मी पक्षाचे ऐकले होते. आताचे निर्णय हे पर्रीकरांच्या पक्षातले वाटत नाहीत. त्यामुळे लोकांकरिता मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असं उत्पल पर्रिकर यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT