goa congress leader girish chodankar claims bjp offered 40 crores to congress mlas to join bjp  
देश

Goa : भाजपकडून आमदारांना ४० कोटींची ऑफर; काँग्रेस नेत्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

पणजी : सध्या गोवा काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्या समोर येत असतानाच येथील एका कॉंग्रेस नेत्याने भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे.त्यानुसार गोव्यातील काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी ४० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.असा आरोप गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश कोडणकर यांनी केला आहे. पक्ष फोडण्याचा कट रचल्याचा आरोप करत आज संध्याकाळी काँग्रेसने आपल्या दोन नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यापैकी एक विरोधी पक्षनेते मायकल लोबो, तर दुसरे दिगंबर कामत यांचा समावेश आहे. या दोघांवर पक्षाच्या सहा आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप आहे. (goa congress leader girish chodankar claims bjp offered 40 crores to congress mlas to join bjp)

गिरीश कोडणकर म्हणाले की, काँग्रेसच्या आमदारांना उद्योगपती आणि कोळसा माफियांच्या माध्यमातून बोलावले जात होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या संदर्भात ज्या आमदारांशी संपर्क साधण्यात आला त्यांनी गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांना याबाबत माहिती दिली. भाजपला आमचे दोन तृतीयांश आमदार फोडायचे आहेत, असे विधानही दिनेश गुंडू राव यांनी केले होते. त्यासाठी मोठी रक्कम देऊ केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी रक्कम जाहीर केली नसली तरी या रकमेबाबत आश्चर्य व्यक्त केले होते.

भाजपने कटाचे आरोप फेटाळले

दुसरीकडे भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले की, काँग्रेसचे हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत.आमदारांशी संपर्क साधण्याचा किंवा त्यांना पैसे दिल्याचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे ते म्हणाले. सदानंद म्हणाले की, हे लोक नेहमीच असे करत आले आहेत. काँग्रेसच्या या गोंधळाशी गोवा भाजपचा काहीही संबंध नाही. आमच्या पक्षात आम्ही असे काही ऐकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT