Uber rates raised high  esakal
देश

गोव्याचा विमान प्रवास डोंबिवलीच्या कॅब प्रवासापेक्षाही स्वस्त ! यजुरचं ट्विट चर्चेत

एका प्रवाश्याने प्रभादेवीपासून ते डोंबिवलीपर्यंत उबर बुक करताना त्याला मोबाईलवर दिसणारे दर थक्क करणारे होते.

सकाळ डिजिटल टीम

सिग्नल सोडता कुठेही न थांबता थेट बुकिंग केली की तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पोहोचवून देण्यास सध्या ओला, उबर या वाहतूक सेवांचा महत्वाचा वाटा आहे.अलीकडे उबरचे दर वाढल्याने प्रवाशांना नेहमीपेक्षा प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे.एका प्रवाश्याने प्रभादेवीपासून ते डोंबिवलीपर्यंत उबर बुक करताना त्याला मोबाईलवर दिसणारे दर थक्क करणारे होते.याबाबतचं त्याचं ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.त्याच्या या ट्विटवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

श्रवणकुमार सुवर्णा प्रभादेवीपासून डोंबिवलीला जाण्यासाठी उबर बुक करण्यासाठी मोबाईलवर त्याला उबरचे जे दर दिसले ते खरं तर थक्क करणारे होते.त्याच्या ट्विट मध्ये त्याने तसा स्क्रिनशॉटही टाकलाय.यामध्ये उबरने प्रभादेवीपासून डोंबिवलीला जाण्याचा राईड रेट तिन ते पाच हजार एवढा दिसतोय.हा दर जवळपास गोवा फ्लाईटच्या दरा एवढा आहे.त्यामुळे त्याच्या या ट्विटवर अनेक प्रवाशांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

उशीरा रात्रीपर्यंत प्रवास करणारे सगळे प्रवासी ओला किंवा उबर कॅब करतात.अश्यावेळी एका राईडचे तीन ते पाच हजार कुठल्याही प्रवाशाला न परवडणारे आहे.अनेकांनी रिट्विट करत आता उबरने प्रवास न करता आम्ही मनपा बसनेच जाणार अश्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.मात्र अनेकांना उशीरा रात्री प्रवास करताना बस किंवा ऑटो मिळत नाही.त्यामुळे अश्यांसाठी हा प्रवास न परवडणारा आणि महागडा ठरतोय.सगळ्याच स्तरावरून उबरच्या वाढत्या दरावर संताप व्यक्त केला जातोय.

अद्यापही श्रवणकुमारच्या या वायरल ट्विटवर उबरच्या अधिकृत अकाऊंटवरून प्रतिक्रिया आलेली नाही.मात्र उबरच्या या वाढत्या दरामुळे प्रवाशांरडून संताप व्यक्त होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT