देश

हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल

सकाळ डिजिटल टीम

पणजी: देशात सध्या कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवताना दिसत येत आहे. या संकटामध्ये लाखो रुग्णांचा जीव गेला आहे. आरोग्य यंत्रणांवर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण असून या पार्श्वभूमीवरच अनेक दुर्घटना घडत आहे. ऑक्सिजन पुरवठ्यातील हलगर्जीपणामुळे गोमेकॉ (Gomeca) हॉस्पिटलमध्ये काही कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward party) गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant), मुख्य सचिव परिमल राय (Chief Secretary Parimal Rai) आणि ऑक्सिजन व्यवस्थापन व वितरणाच्या प्रमुख स्वेतिका सचन (Head of Oxygen Management and Distribution Swetika Sachan) या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हलगर्जीपणा, कटकारस्थान (oxygen shortage deaths case) तसेच सदोष मनुष्यवध या आरोपाखाली काल आगशी पोलिसांत ही तक्रार दाखल केली गेली आहे. (Goa Forward Party has filed a complaint against Goa CM Pramod Sawant)

बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांना करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. या कोरोनाग्रस्त रुग्णांना सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा आणि साधनसुविधा पुरवण्याची जबाबदारी या तिघांची होती. या रुग्णांना कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा झाल्याने 72 जणांचा जीव गेला.

यासंदर्भात गोवा फॉरवर्ड पक्षाचे संयोजक जॉन नाझारेथ यांनी तक्रार करताना म्हटलंय की, ऑक्सिजन पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी तसेच त्रुटी उघडकीस येऊनही मुख्यमंत्र्यांसह इतर दोघा आयआएस अधिकाऱ्यांनी कोणतीच ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न केला नाही. ऑक्सिजनचा पुरवठ्यात कोणताही खंड पडू न देता रुग्णांचा जीव वाचविण्याची त्यांची जबाबदारी होती. त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नाही. ते आपल्या कार्यात अपयशी ठरले.

पुढे त्यांनी म्हटलंय की, हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्याचे माहीत असून या तिघांनी तो वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच इतर दोघा आयएएस अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदारीत निष्काळजीपणा केला आहे. माहीत असूनही प्रयत्न न केल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाना जीव गमवावा लागला. हे तिघेही आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आहेत. हे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने या तिघांनाही जबाबदार धरून गुन्हा नोंदविण्याची विनंती पक्षाचे संयोजक जॉन नाझारेथ यांनी तक्रारीत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT