

Team India T20 World Cup 2026 Semifinal Qualification Scenarios
Sakal
India T20 World Cup 2026 semifinal qualification scenarios: आयसीसी स्पर्धांमध्ये सलग १७ विजय मिळवलेल्या भारतीय संघाचा विजयी रथ अखेर दक्षिण आफ्रिकेने रोखला. टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेने भारताला ७६ धावांनी पराभूत केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला.
दरम्यान हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिका (South Africa) या स्पर्धेत ५ सामन्यांनंतरही अपराजित राहिले आहेत. मात्र या पराभवामुळे भारतासमोर (Team India) मार्ग आता कठीण झाला आहे. सुपर-८ फेरीतून (Super-8) दोन्ही गटातून प्रत्येकी २ अव्वल संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहेत.