PM Narendra Modi ANI
देश

स्वातंत्र्यासाठी गोव्याने सर्वात जास्त काळ संघर्ष केला - PM मोदी

गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

सुधीर काकडे

गोवा मुक्ती दिनानिमित्त (Goa Mukti Divas) आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. देश गोव्याच्या आधी स्वतंत्र झाला होता. त्यानंतर अनेक स्वातंत्र्य सेनानी गोव्यासाठी झटले, गोव्याच्या नागरिकांनीही मुक्ती संग्रामाची ज्योत विझू दिली नाही, असं म्हणत त्यांनी गोव्याने सर्वात जास्त काळ स्वातंत्र्यासाठी संघर्ष केल्याचं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतींना देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी वंदन केलं.

गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न कऱणाऱ्या गोव्यातील आणि देशातील स्वातंत्र्यसेनींना स्मृतींना पंतप्रधान मोदींनी उजाळा दिला. देशात विकास करण्यामध्ये, मुलींसाठी शाळा, स्वच्छता, दरडोई उत्पन्न, प्रधानमंत्री ग्राम रस्ते योजना यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये गोवा पुढे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. याचं सर्व श्रेय त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या सरकारचं अभिनंदन केलं.

गोव्याचा विकास करण्यासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने गोव्याचं महत्व वाढवण्यासाठी पर्रीकरांनी चांगलं काम केलं. केंद्र सरकारने सुद्धा पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं. येणाऱ्या काळात मिशन गती शक्ती पर्यटनाच्या विकासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी एक नव आदर्श ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, आणि सबका प्रयास हा नवा मंत्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. ज्या पद्धतीने गोव्याच्या नागरिकांनी आतापर्यंत काम केलं, तसंच यापूढेही करा असं आवाहन त्यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये सहकार विभागाची अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT