Digambar Kamat Sakal
देश

Digambar Kamat : कधीकाळी पर्रीकरांचं सरकार पाडणारे दिगंबर कामत भाजपच्या वाटेवर

सकाळ डिजिटल टीम

Goa Congress Political Crises : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर आता गोव्यातील काँग्रेसचे आठ आमदार भाजपममध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही राजकारणाचा हायव्होलटेज ड्रामा पाहण्यास मिळू शकतो. या पक्षांतरामध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांचादेखील समावेश आहे. कामत हे 1994 पासून आमदार असून, त्यांनी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पाडण्यात कामत यांचा मोठा वाटा होता.नुकतेच काँग्रेसच्या गोवा युनिटमध्ये झालेल्या गोंधळानंतर कांग्रेस कार्य समितीच्या स्थायी आमंत्रित सदस्य पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.

कामत हे गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेले असून, कामत गोवा काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये गोवा विधानसभेची निवडणूकीत ते ८व्यांदा रिंगणात होते. यातही त्यांनी विजयी पताका फडकवली होती. दिगंबर कामत हे 1994 पासून सातत्याने आमदरा म्हणून निवडून येत आहे.

कामत यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेसमधून सुरुवात केली. मात्र 1994 मध्ये त्यांना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2005 पर्यंत ते भाजपमध्ये राहिले. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी भाजपला रामराम करत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पर्रीकरांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पाडण्यात कामतांचा वाटा

गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पाडण्यात कामत यांचा मोठा वाटा होता. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात काँग्रेसचा विजय झाला आणि त्यानंतर काँग्रेससोबत झालेल्या करारानुसार दिगंबर कामत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. 2012 पर्यंत ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. एवढेच नव्हे तर, कामत यांनी गोव्याचे तीन वेळा ऊर्जामंत्री पदही भूषविले आहे.

त्याशिवाय प्रतापसिंह राणे सरकारमध्ये ऊर्जा, खाण आणि संस्कृती मंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, पण सरकार भाजपने स्थापन केले. त्यानंतर दिगंबर कामत यांची गोवा विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून निवड करण्यात आली होती.

खाण घोटाळ्यात कामतांवर आरोप

दिगंबर कामत हे 10 वर्षांहून अधिक काळ गोव्याचे खाण मंत्री होते, त्या काळात त्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोपही झाले होते. 35 हजार कोटींच्या या खाण घोटाळ्यात अनेक नोकरशहा आणि खाण माफियांची नावे आली होती. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्व आमदारांना धार्मिक स्थळी नेऊन पक्षनिष्ठेची शपथ दिली होती. त्यानंतर आता दिगंबर कामतांसह काँग्रेसचे 8 आमदार भाजप वाटेवर आहेत. त्यामुळे गोव्यात आगामी काळात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: दांडिया उत्सवात जुन्या वादाचा भडका; चाकूहल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू, दोघे जखमी

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

Cheesy Popeye Poppers Recipe: बाहेरून कुरकुरीत, आतून चीजने भरलेले; पालक आणि काळ्या चण्यांपासून बनवा झटपट स्नॅक्स

आजचे राशिभविष्य - 21 ऑक्टोबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑक्टोबर 2026

SCROLL FOR NEXT