Budget 2023 
देश

Budget 2023 : लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरावर होणार परिणाम!

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे. सरकारने जुनी करप्रणाली रद्द केली. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी कोणत्या वस्तू स्वस्त केल्या जात आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होत आहेत हे देखील सांगितले आहे. 

अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीबाबत सरकार काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीसाठी कस्टम ड्युटीमध्ये सूट दिली जाईल. याशिवाय टेक्सटाइल वगळता मूळ कस्टम ड्युटी दर २१ वरून १३ पर्यंत कमी केला जाईल. त्याचबरोबर सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली. त्यामुळे सोने-चांदी आणि प्लॅटिनम महाग होणार आहे.

याशिवाय येणाऱ्या काळात सिगारेटसाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी १६ वाढवण्यात आली आहे. याशिवाय, सरकारने टेलिव्हिजनच्या खुल्या विक्रीच्या घटकांवरील कस्टम ड्युटी २.५ टक्के कमी केली आहे. ज्या उत्पादनांवर कस्टम ड्युटी वाढते, त्या वस्तू महाग होतात. 

काय होणार स्वस्त?

एलएडी टिव्ही स्वस्त होणार

कॅमेरा लेन्स स्वस्त होणार

मोबाईल फोन टिव्ही स्वस्त होणार

इलेक्ट्रोनिक गाड्या स्वस्त होणार

खेळणी, सायकल स्वस्त होणार

काय महागणार?

सिगारेट महागणार

विदेशी किचन चिमण्या महागणार

चांदीचे दागिने आणि भांडी महागणार

सोनं-चांदी, प्लॅटिनम महागणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT