Golden Taxi esakal
देश

Golden Taxi : सोन्याची बनलीय ही लक्झरी टॅक्सी, 'रॉयल ट्रॅव्हल'साठी येईल एवढा खर्च

रस्त्यावरून कोणतीही लक्झरी कार गेली की क्षणभर सर्वांच्या नजरा त्या गाडीवर खिळल्या जातात

सकाळ डिजिटल टीम

Golden Taxi : रस्त्यावरून कोणतीही लक्झरी कार गेली की क्षणभर सर्वांच्या नजरा त्या गाडीवर खिळल्या जातात. आजकाल देशाच्या आयटी हब अर्थात बंगळुरूच्या रस्त्यांवर लक्झरी टॅक्सी पाहायला मिळत आहे, तुम्हीही विचार करत असाल की रस्त्यावर धावणाऱ्या टॅक्सीला लक्झरीचं नाव का दिलंय ? यामागील कारण आणि या आलिशान कारला एका दिवसासाठी भाड्याने किती खर्च येतो हे जाणून घेऊ .

रोल्स रॉयस टॅक्सी भाडे

बंगळुरूच्या रस्त्यावर धावणारी ही लक्झरी टॅक्सी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे कारण या कारला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. ब्रिटीश कार उत्पादक कंपनी रॉयल रॉयसची ही फॅंटम नावाची कार आहे. केरळमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाने ही सोन्याचा मुलामा असलेली कार भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. ही कार एका दिवसासाठी भाड्याने घेण्यासाठी तुम्हाला 25 हजार रुपये खर्च करावे लागतील. Rolls Royce ची ही लक्झरी कार भारतात विकली जाणारी कंपनीची सर्वात महागडी कार आहे.

Rolls Royce Phantom Series VIII किंमत

बर्‍याच मीडिया रिपोर्ट्समध्ये रोल्स रॉइसच्या फॅंटम सीरीज VIII च्या सध्याच्या मॉडेलच्या किंमतीबद्दल सांगण्यात आले आहे की या कारची किंमत 10 कोटी 30 लाख रुपयांपासून सुरू होते. Rolls Royce वाहने भारतात खूप महाग आहेत, कारण किंमत पाहून तुम्हाला समजले असेलच, कारण या गाड्या फक्त उद्योगपती आणि सेलिब्रिटींकडेच दिसतात.

बंगळुरूच्या रस्त्यावर दिसणारी ही कार रोल्स रॉयस फॅंटम VII LWB आहे. सीट मॅनेजर इत्यादी अनेक लक्झरी फीचर्स या कारमध्ये दिसतात. या कारमध्ये 6.75 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड V12 इंजिन आहे जे 460PS पॉवर आणि 720Nm टॉर्क जनरेट करते. एवढेच नाही तर ही कार फक्त 6.1 सेकंदात 0 ते 100kmph चा वेग पकडू शकते. या कारचा टॉप स्पीड 240kmph आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Vijay Shivtare : बापासाठी काळजाचा तुकडा सरसावला! आमदार शिवतारेंना लेकीने दान केली किडनी; बाप-लेकीच्या नात्याला महाराष्ट्र करतोय 'सलाम'

Nashik Bribery Case : ZP च्या उपअभियंत्याला 3 लाखांची लाच घेताना पकडले; शाखा अभियंत्यानं मागितलेली दोन लाखांची लाच

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये १२ नवीन घाट उभारणार

Navid Mushrif Gokul election : मुश्रीफ गोकुळमध्ये सतेत पाटलांची साथ सोडणार? निवडणुकीसाठी अमल महाडिक, यड्रावकरांना भेटणार, खुद्द मुश्रीफांनी दिली कबुली

विशाखा सुभेदार यांच्या नाटकावेळी असं काय घडलं की, कलाकारांनी स्वत:च्या हाताने पडदा ओढला

SCROLL FOR NEXT