liquor News esakal
देश

Liquor News: आता दारुच्या प्रत्येक बाटलीवर दहा रुपये गोमाता अधिभार; काय आहे सरकारचा निर्णय?

सकाळ डिजिटल टीम

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयान्वये दारुच्या प्रत्येक बाटलीवर सर्वांना अधिभार सोसावा लागेल. शुक्रवारी हिमाचल प्रदेशचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यामध्ये याबाबत घोषणा करण्यात आली.

हिमाचल प्रदेशमध्ये दारुवर जो १० रुपये अधिभार लावण्यात येणार आहे तो गोमाता अधिभार या नावाने आकारला जाईल. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, यामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे.

हेही वाचाः ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

हिमाचल प्रदेश सरकारच्या या दारुसंबंधी निर्णयामुळे सरकारला वर्षाकाठी शंभर कोटी रुपयांचा महसूल मिळेल. महसूलवाढीसाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

सुक्खू यांनी आज पहिला अर्थसंकल्प सादर केला. या निर्णयामुळे राज्याला नवी दिशा मिळेल, असं ते म्हणाले.

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये बेरोजगारांना व्यवसायासाठी ४० टक्के सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ३० हजार कार्यात्मक पदे भरण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

यासह अंगणवाडी सेविकेला ९ हजार ५०० रुपये मानधन, अंगणवाडी मदतनीस आणि आशा सेविकांनी ५ हजार २०० मानधन, आमदारांचा निधी २ कोटींवरुन २.१० कोटी करण्यात आला.

रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या मजुरीमध्ये २५ रुपयांनी वाढ करण्यात आलेली असून ३७५ रुपये मजुरी मिळेल.

मुलींना उच्च शिक्षणासाठी इलेक्ट्रिक स्कूटी खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला.

हिमाचल प्रदेशमधील २० हजार मुली याचा लाभ घेऊ शकतील. तसेच चार्जिंग स्टेशनसाठी ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT