LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

LPG e-KYC Deadline : ग्रामीण आणि शहरी भागातील LPG Booking नियम वेगवेगळे आहेत. एलपीजी डिलिव्हरीसाठी OTP आवश्यक असून, ग्रामीण भागात साधारण ४५ दिवसांनी तर शहरी भागात २५ दिवसांनी सिलेंडर बुकिंग करता येते.
Check LPG cylinder booking rules

Check LPG cylinder booking rules

esakal

Updated on

एलपीजी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज, १६ ऑगस्ट, ही ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. जर ग्राहकाने ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर १७ ऑगस्टपासून त्यांना एलपीजी सिलेंडर बुक करता येणार नाही. एका रिपोर्टनुसार इंडियन ऑइलने सर्व ग्राहकांना १६ ऑगस्टपर्यंत त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. या रिपोर्टमध्ये असेही नमूद केले आहे की, ही विशिष्ट मुदत 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'च्या ग्राहकांना लागू होत नाही; तरीही, त्यांच्यासाठीही ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com