देश

दिलासादायक! हाताला काम देण्यात महाराष्ट्र आघाडीवर; ऑक्‍टोबरमध्ये रोजगारांत वाढ

मंगेश वैशंपायन - सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनाच्या साथीमुळे झालेल्या आर्थिक दुरवस्थेतून देश सावरत असतानाच गेल्या दोन महिन्यांत नव्या रोजगारांच्या संधी तब्बल ६० टक्‍क्‍यांनी घटल्या आहेत. या स्थितीतही रोजगार वाढत चाललेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्याने याबाबत गुजरात, दिल्ली, पंजाब व तमिळनाडूसारख्या राज्यांनाही मागे टाकले आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार यंदा सप्टेंबरमध्ये देशात ७३,४१६ नवे रोजगार उपलब्ध झाले होते त्यांची संख्या ऑक्‍टोबरमध्ये २८,६१८ इतकी घसरली आहे. 

ज्या राज्यांत मागील दोन महिन्यांत रोजगारांची एकूण संख्या वाढली त्यात कर्नाटक (३२६३), महाराष्ट्र (३२२७), दिल्ली (१५६८), गुजरात (२८११) या राज्यांचा समावेश आहे. मात्र कर्नाटकापाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती होत आहे. उत्तर प्रदेश व हरियानातील एकूण रोजगार महाराष्ट्रापेक्षा जास्त असले तरी, त्यांचा कल उतरता राहिलेला आहे. महाराष्ट्रात मुंबई (५२८) व पुणे (२३७) हीच सर्वाधिक नवीन रोजगारांच्या सृजनाची केंद्रे कायम आहेत. 

कोरोनाच्या फटक्‍यामुळे देशातील बेरोजगारीचे प्रमाण ग्रामीण भागात ६.९ टक्‍क्‍यांवर तर राष्ट्रीय पातळीवर ६.८९ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. मनरेगाच्या कामाच्या प्रती दशलक्ष मनुष्य दिवसांचे प्रमाणही (पर्सन डेज) मागच्या दोन महिन्यांत २६५ वरून १७३ दिवसांवर घसरले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय रोजगार (श्रम शक्ती) मंत्रालयाच्या पोर्टलनुसार सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्‍टोबरमध्ये नवीन नोकऱ्यांची संख्या तब्बल ९८, ७३७ ने घटली आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रोजगार कमी झाल्याचा अर्थ हा की संबंधित कंपन्यांना रिक्त जागा भरायच्या नाहीत किंवा त्या भरल्या गेल्या आहेत. या पोर्टलवर कृषी, अर्थ, उद्योग, विमा व रिअल इस्टेटसह २२ क्षेत्रांतील रोजगारांच्या संधी आहेत. देशभरात १ कोटी ०३ कोटी लोक नोकऱ्या मागत आहेत मात्र उपलब्ध रोजगार ५७,७४१ इतकेच आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नवे रोजगार देणारी प्रमुख राज्ये (सप्टेंबर-ऑक्‍टोबर)  
कर्नाटक - १५६७-१६९३ 
महाराष्ट्र - १५२६-१५९४ 
गुजरात - १२७३-१५३८ 
दिल्ली ५९५ - ९७३ 
राजस्थान १८५ - ३४२ 
केरळ -१७९-२१५ 

रोजगार घटलेली प्रमुख राज्ये 
बिहार २०३ -१०७ 
हरियाना १३७८- ४२१ 
उत्तर प्रदेश ९७४- ९५७ 
झारखंड -३३८- १०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! निवडणूक आयोगाविरोधात विरोधक मैदानात उतरणार, १ नोव्हेंबरला मुंबईत महामोर्चाचं आयोजन, ठाकरे बंधू राहणार उपस्थित

Rohit Sharma ने वडापाव सोडला, तीन महिन्यांची न थकता ट्रेनिंग! ११ किलो वजन कमी करण्यामागचं गुपित अभिषेक नायरने उलगडलं

Crime News : किरकोळ वादातून चाकू हल्ला आणि खून! फरारी आरोपी राजूचा ११ वर्षांपूर्वीचा थरार; संजय पिसेंची यशस्वी उकल

Nashik Crime : ५० लाखांची लाच मागितली! नाशिकच्या सेंट्रल जीएसटी अधीक्षकाला सीबीआय कडून अटक, तात्काळ निलंबित

Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणी... प्रियजनांना पाठवा लक्ष्मीपूजनाच्या मराठीतून खास शुभेच्छा, वाचा हटके संदेश

SCROLL FOR NEXT