Google Maps help Delhi cops reunite 12-year-old girl with family after four months 
देश

गुगल मॅपमुळे चार महिन्यांनी मुलगी परतली घरी!

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः जगभरात माहिती तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जात असून, याच तंत्रज्ञानामुळे चार महिन्यानंतर हरवेली मुलगी घरी परतली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुलीला पाहिल्यानंतर कुटुंबियांना मोठा आनंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी एक 12 वर्षाची मुलगी रिक्षामध्ये बसण्यासाठी आली. परंतु, तिला आपला पत्ता सांगता येत नव्हता. यामुळे रिक्षाचालकाने संबंधित मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले. तपासादरम्यान जतीन वडीलांचे नाव असल्याचे एवढेच सांगत होती. परंतु, एवढ्या माहितीवरून घरच्यांचा शोध लागत नव्हता. अखेर, तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते.

पोलिसांनी पुन्हा तिच्या घरच्यांचा तपास करण्यास सुरवात केली. तिच्याकडे पुन्हा-पुन्हा माहिती घेतल्यानंतर साकपर, सोनबरसा व खुर्जा गावांची नावे सांगू लागली. पोलिसांनी गुगल मॅपवर ही नावे टाकल्यानंतर उत्तर प्रदेशातील ही गावे असल्याचे लक्षात आले. घटनास्थळी गेल्यानंतर कुटुंबियांचा शोध लागला. एक ऑगस्ट रोजी मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आली.

मुलीचे वडील जतीन म्हणाले, 'मुलीला उपचारासाठी दिल्लीला घेऊन गेलो होतो. बहिणीचे घर किर्तीनगर येथे आहे. बहिणीच्या घरातून होळीच्या दिवशी बेपत्ता झाली. खूप शोध घेतला, परंतु सापडू शकली नाही. पण, पोलिसांकडे तक्रार केली नव्हती.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT