Gujarat high court notice to Google Esakal
देश

High Court Notice to Google: बाल्यावस्थेतील नग्न फोटोंवरुन गुगलनं घातला मोठा घोळ; हायकोर्टानं पाठवली नोटीस

Gujarat high court notice to Google: गुगल ड्राइव्हवर बालपणीचा फोटो अपलोड झाल्यानंतर, Google ने फोटोला चाइल्ड पॉर्न समजून वापरकर्त्याचे खाते ब्लॉक केले. त्यानंतर युजरने गुजरात हायकोर्टात धाव घेतली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Gujarat high court notice to Google: गुजरात हायकोर्टाने एका अनोख्या प्रकरणात गुगलला नोटीस बजावली आहे. गुगल ड्राइव्हवर बालपणीचा फोटो अपलोड केल्यानंतर, Google ने फोटोला चाइल्ड पॉर्न म्हणत युजरचे अकाउंट ब्लॉक केले. त्यानंतर युजरने उच्च न्यायालयात धाव घेतली. गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशिवाय न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारलाही नोटीस बजावली आहे.

२४ वर्षीय अभियंता नील शुक्ला यांनी सांगितले की, हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा तो फक्त 2 वर्षांचा होता. त्याची आजी त्याला अंघोळ घालत होती आणि तो त्या फोटोत नग्न होता. गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने या फोटोला चाइल्ड पॉर्न गृहीत धरले आणि त्याचे अकाउंट ब्लॉक केले.

नीलने सांगितले की, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याने गुगल ड्राइव्हवर त्याचे फोटो अपलोड केले होते, त्यानंतर त्याचे अकाउंट ब्लॉक करण्यात आले होते. खाते ब्लॉक केल्यामुळे, ईमेल उघडत नाहीत आणि व्यवसायाचे नुकसान होत आहे. नीलने त्याचे खाते पुन्हा सुरू करण्यासाठी गुगलशी संपर्क साधला पण गुगलने तसे केले नाही. त्यानंतर या तरुणाला उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली.

वकील दीपेन देसाई यांनी खटल्याच्या लवकर सुनावणीची मागणी करताना सांगितले की, नीलला गुगलकडून नुकतीच नोटीस मिळाली आहे की, त्याच्या खात्याशी संबंधित डेटा एप्रिलमध्ये हटवला जाईल. त्या अकांऊटवरी असणारी सर्व माहिती हटवली जाईल. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती व्हीडी नानावटी यांनी अधिकारी आणि गुगलला नोटीस बजावली आणि 26 मार्चपर्यंत उत्तर मागितले.

अभियंता नील यांनी सांगितले की, गुगलने आंघोळीचा फोटो चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणून लक्षात घेऊन अकाऊंट ब्लॉक केले होते, त्यानंतर त्याने त्याच्या इतर अकाउंटवरून काम करण्याचा प्रयत्न केला पण जॉइंट व्हेरिफिकेशनमुळे तो आयडीही ब्लॉक करण्यात आला. अनेकवेळा तक्रारी करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यानंतर गुजरात पोलिस आणि भारतातील अशा प्रकरणांसाठी नोडल एजन्सी असलेल्या केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाशी संपर्क साधण्यात आला. परंतु नीलने सांगितले की अधिकारी गप्प राहिले आणि त्यांनी न्यायालयात जाण्यास भाग पाडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; प्रशासनाचे दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT