Chromebook  
देश

Sundar Pichai : गुगल भारतात बनवणार 'क्रोमबुक'! आयटी राज्यमंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली: भारतात क्रोमबुक तयार करण्याच्या अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी 'गुगल'च्या निर्णयाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी स्वागत केले आहे. गुगलच्या क्रोमबुक उपकरणांची भारतात निर्मिती करण्याच्या योजनेबद्दल कळल्यानंतर आपल्याला आनंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

यासंदर्भात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीवर प्रतिक्रिया देताना आयटी राज्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि PLI धोरणांमुळे, भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात एक पसंतीचा भागीदार म्हणून उदयास येत आहे. यामध्ये IT हार्डवेअर PLI2.0 महत्त्वपूर्ण आहे. PLI ने भारतात लॅपटॉप आणि सर्व्हर निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे.

सुंदर पिचाई यांनी ट्विटरवर लिहिले की, "आम्ही भारतात Chromebook तयार करण्यासाठी HP सोबत भागीदारी करत आहोत. भारतात बनवलेलं हे पहिलं Chromebook असेल. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या आणि सुरक्षित संगणकीय अभ्यास करणं सोपं होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT