Ahmed Murtaza Abbasi Sakal
देश

धक्कादायक! गोरखनाथ मंदिरावरील हल्लेखोर IIT चा इंजिनियर अन्...

मुर्तझा अब्बासी याचे वडील मोहम्मद मुनीर हे अनेक वित्त कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार होते.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिराच्या (Gorakhnath Temple Attack) सुरक्षेवर तैनात असलेल्या जवानांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या अहमद मुर्तझा अब्बासीबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, अहमद मुर्तजा अब्बासी (Ahemad murtaza abbasi) यांच्याशी संबंधित अनेक माहिती समोर आली आहे. आरोपी अहमद मुर्तजा अब्बासी हा गोरखपूरच्या सिव्हिल लाइन भागातील रहिवासी आहे. मुर्तझा अब्बासी याचे वडील मोहम्मद मुनीर हे अनेक वित्त कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार होते. (Gorakhnath Temple Attacker profile)

अहमद मुर्तझा अब्बासी यांनी 2015 मध्ये आयआयटी बॉम्बेमधून (IIT Bombay) केमिकल इंजिनिअरिंगमध्ये (Chemical Engineering ) पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. 2015 मध्ये अभियांत्रिकी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये (Reliance Industry ) आणि नंतर एस्सार पेट्रोकेमिकल्समध्ये नोकरी केली. 2017 पासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अहमद मुर्तझा अब्बासी यांच्यावर अनेक डॉक्टरांनी उपचार केले असून, तो मुंबईत राहत होता. मुर्तझा अब्बासी याच्यावर अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून अहमद मुर्तझा अब्बासी याच्या मित्रांच्या भेटीगाठीही कमी झाल्या होत्या. मुर्तुजा अब्बासी यांचे काका गोरखपूरचे मोठे डॉक्टर असून ते अब्बासी हॉस्पिटलचे मालक आहेत.

एक लग्न फिस्कटले तर दुसऱ्या बोयकोने सोडले

आरोपी मुर्तझा अब्बासीचे पहिले लग्न ठरवाताना चर्चेदरम्यान मोडले होते. अब्बासी याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले पण तीही सोडून निघून गेली.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर

दरम्यान, मुर्तझा अब्बासी याने केलेल्या गोरखपूर येथील हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो पोलिसांवर हल्ला करताना दिसत आहे. गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिराच्या गेटवर सुरक्षा जवानांवर हल्ला करून पळून गेलेल्या अली मुर्तझा अब्बासीला लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT