देश

लंकेश हत्या प्रकरणः सर्व संशयितांवर कोका

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केलेल्या सर्व संशयितांवर कोकाअंतर्गत (कर्नाटका ऑर्गनाईझड क्राईम कंट्रोल ॲक्‍ट) अखेर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अटकेतील कोणालाही जामीन मिळणे कठीण आहे. तसेच कोकाप्रकरणात राज्यातील बंगळूर, कारवार आणि बेळगाव या तीनच ठिकाणच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होऊ शकते. त्यामुळे अटकेतील संशयितांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणाला एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. विशेष तपास पथकाने सखोल तपास करून आतापर्यंत १४ संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटकेतील सर्वांकडून महत्वाची माहिती तपास पथकाच्या हाती लागली आहे. लंकेश यांच्या हत्येपूर्वी संशयितांनी बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण कोठे घेतले. त्यांच्यावर गोळ्या कोणी झाडल्या, आदी महत्वाची माहिती यापूर्वीच तपासत पुढे आली आहे. त्यामुळे एसआयटीला अधिकारी या प्रकरणाच्या तळाशी जाऊन पोहचले आहेत. लवकरच प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्‍यता आहे. मात्र, पथकाला लंकेश यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल अद्याप सापडलेली नाही. यामुळे तपास अधिकारी त्या बंदुकीच्या शोधात आहेत.

अलिकडेच महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या सुधन्वा गोंधळेकरला अटक केली होती. त्याच्याकडे देशी बनावटीच्या पिस्तुलीसह स्फोटके ताब्यात घेण्यात आली होती. त्यापैकीच एखाद्या पिस्तुलीने लंकेश यांची हत्या करण्यात आली असावी, या शक्‍यतेने गोंधळेकरला एसआयटीने ताब्यात घेऊन चौकशी चालविली आहे. शनिवारी (ता. १४) त्याला घेऊन एसआयटी पथक बेळगावला आले होते. त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत अटकेतील कोणालाही जामीन मंजूर होऊ नये, यासाठी त्यांच्यावर कोकांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तीनच ठिकाणी सुनावणी
कोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या संशयितांच्या खटल्यावर केवळ राज्यातील बंगळूर, कारवार, बेळगाव तीनच जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होऊ शकते. एसआयटीने कोकांतर्गत गुन्हा दाखल केल्याने अटकेतील संशयितांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT