देश

देशातील काही दुकानं सुरु करण्यास परवानगी; पण...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायसरने जगभरात थैमान घातले आहे. त्यापार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, देशभरातील सर्व मॉल्स् आणि दुकानं बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता यातील काही दुकानं सुरु करण्यास अटींसह परवानगी देण्यात आली आहे. परंतु, मॉल्स् अद्यापही बंदच राहणार आहेत. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पत्रक काढले आहे. त्यावरून देशातील सर्व दुकानं काही अटींवर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून विविध दुकानं सुरु करण्यात येणार आहेत. कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या (हॉटस्पॉट) ठिकाणी आणि कँटोन्मेंट ठिकाणी मात्र दुकानं उघडी ठेवता येणार नाहीत. याशिवाय मद्य विक्रीची दुकानं, मॉल्स सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही. 

पुणे, मुंबईतील दुकानं सुरु होणार नाहीत

राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्स होणार आहे. त्यामध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर त्याचे निकष जाहीर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्रात पुणे (हॉटस्पॉट), मुंबई (धारावी परिसर), सोलापूर शहर, बारामती, धुळे आणि मालेगाव असे हॉटस्पॉटचे भाग आहेत. तेथे दुकाने सुरू होण्याची शक्यता अजिबात नाही.

नगरपालिका क्षेत्राबाबत...

देशातील पालिका आणि नगरपालिकांच्या बाजारपेठांमधील दुकानांबाबतही गृहमंत्रालयाने पत्रकात नमूद केले आहे. यामध्ये सांगण्यात आले, की या क्षेत्रातील दुकानं 3 मेपर्यंत उघडता येणार नाहीत.

'शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट' कायद्यांतर्गत येणाऱ्या दुकानांनाच सूट 

राज्याच्या 'शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट' कायद्यांतर्गत येणाऱ्या दुकानांनाच सूट देण्यात आली आहे. मद्यविक्रीची दुकानं ही एक्ससाइज कायद्यांतर्गत येतात. त्यामुळे ही दुकानं बंदच राहणार आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाने पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. असे असले तरीदेखील राज्य सरकार मात्र आपल्या अधिकारानुसार दुकानं सुरू ठेवायची की नाही यावर निर्णय घेऊ शकतात. 

50 टक्के कामगारांसह कामाची मुभा

सामान्य दुकानांना 50 टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच काम करणाऱ्यांना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT