notes 
देश

गुड न्यूज! सहा महिन्यांनी होणार पगारवाढ, कारण...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : होय, खरंच दर सहा महिन्यांनी पगारवाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा मिळण्यासाठी सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी सरकारने नोकरदारांसाठी ही नवी योजना आणली आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसाठीच ही वाढ असणार आहे. महागाईची झळ बसत असलेल्या खासगी क्षेत्रातील नोकदारांना दिलासाच मिळाला आहे. नव्या महागाई निर्देशांकानुसार, ही वेतनवाढ निश्चित केली जाणार आहे. या निर्णयामुळे इंडस्ट्रीयल सेक्टर (औद्योगिक क्षेत्र) 3 कोटी नोकरदारांना याचा थेट फायदा मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसोबत प्रत्येक 6 महिन्यांनंतर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे मूल्यांकन केले जाते.

सरकारने या संदर्भात एक समिती स्थापन केली आहे. कामगार मंत्रालयाचे सल्लागार बी. एन. नंदा यांनी 27 फेब्रुवारीला एक बैठक घेतली होती. या बैठकीत इंडस्ट्रीयल सेक्टरमधील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून महागाई निर्देशांकानुसार ही वाढ देण्यात येईल असे सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Stock Market Crash Today: काल तेजी, आज क्रॅश! शेअर बाजार अचानक का कोसळला? जाणून घ्या 5 मोठी कारणं

Ashok Kharat: भोंदू बाबाची 'स्पेशल २६ टीम'... बनावट छापे टाकण्यात अन् व्यापाऱ्यांना धमकावून जाळ्यात ओढण्यात माहिर

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

तरुणीच्या विनयभंग प्रकरणात अटक होईल, ५५ वर्षीय प्राचार्याला धमकावत ७ लाख उकळले; PSI, रिलस्टार महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा

दुनियादारी फेम अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी! सुरुवातीच्या काळात नायकाची भूमिका नाकारली, पण मालिकांनी बदललं आयुष्य

SCROLL FOR NEXT