up government
up government 
देश

मोदींचा मंत्र मनावर घेतला; उत्तर प्रदेशने 8 महिन्यात कमावले 138 कोटी

सकाळ वृत्तसवेा

लखनऊ - कोरोनाचं संकट ही एक संधी आहे. या संकटाला संधीत बदला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. मोदींचा हा मंत्र उत्तर प्रदेशने अंमलात आणल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेश सरकारने गेल्या 8 महिन्यात जवळपास 137 कोटी रुपये कमावले आहेत. सरकारने कोरोना काळात उत्तर प्रदेशसह राज्याच्या बाहेर सॅनिटायझर विक्रीतून ही कमाई केली आहे. 

उत्तर प्रदेशच्या महसूल विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साखर कारखान्यांमध्ये आणि लहान युनिटमध्ये 24 मार्च ते 15 नोव्हेंबर पर्यंत 177 लाख लिटर सॅनिटायझरचे विक्रमी उत्पादन घेण्यात आलं. यातून सरकारला तब्बल 137 कोटी रुपये मिळाले आहे. उत्पादन केलेल्या सॅनिटायझरपैकी बाहेरील राज्यांमध्ये 78.38 लाख लीटर सॅनिटायझरची विक्री करण्यात आली. तर एकूण उत्तर प्रदेशात 87 लाख लीटर सॅनिटायझर विक्री झाली. अशा प्रकारे एकूण 165.39 लाख लीटर सॅनिटायझरची विक्री झाल्याची माहिती विभागाने दिली. 

मुख्य सचिव संजय आर भूसरेड्डी यांनी म्हटलं की, अबकारी विभागाने सॅनिटायझरचे वेळेवर उत्पादन केलं आणि बाजारात वेळेवर उपलब्ध होईल यासाठी काळजी घेतली. यामुळेच उत्तर प्रदेशला सॅनिटायझरमधून उत्पन्न मिळवण्यात एक विक्रम रचता आला. सॅनिटायझरच्या उत्पादनातून 12,848 लाख रुपयांचा जीएसटी आणि 794 लाख रुपयांचे परवाना शुल्क विभागाला मिळाले. उत्पन्नासह कोरोनाविरोधात लढण्यासाठी सॅनिटायझरची भूमिका महत्त्वाची ठरली असंही ते म्हणाले. 

उत्तर प्रदेशात कोरोनाचे 5 लाखांहून अधिक रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. यापैकी 4 लाख 93 हजार जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत राज्यात 7 हजार 524 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी 91 लाखांच्यावर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 1 लाख 34 हजारांच्या वर गेला आहे. 

एकीकडे कोरोनाची लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. काही लशींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या असून कोरोनावर प्रभावी ठरत आहेत. असे असतानाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोक्याची शक्यता असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. तसंच कोरोनाची लस 2021 च्या पहिल्या तिमाहीत येऊ शकते. त्यादृष्टीने अनेक देशांनी वितरण प्रणाली सज्ज करण्यास सुरुवात केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घाणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

SCROLL FOR NEXT