remdesivir. 
देश

ब्रेकिंग : देशात 'रेमेडीसिव्हीर'चा प्रचंड तुटवडा; अखेर केंद्राकडून निर्यातीवर बंदी

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्यात तर कोरोनाचा हाहाकार पहायला मिळतो आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरलेले रेमेडीसिव्हीर या औषधाची मागणी सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण या औषधाच्या वाढत्या मागणीमुळे त्याचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी या औषधासाठी रांगाच्या रांगा लागत असल्याची परिस्थिती आहे. या औषधावाचून अनेक रुग्णांचा प्राण जात असल्याच्या घटना घडत आहेत. प्राप्त परिस्थितीत देशाला या औषधाची गरज सर्वांत जास्त आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने आता रेमेडेसिव्हीर औषधाची परदेशातील निर्यात थांबवली आहे. देशातील परिस्थिती जोवर सुधारत नाही तोवर या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

रेमडेसिव्हीरच्या देशातील सर्व उत्पादकांनी त्यांच्या वेबसाइटवर, त्यांच्या स्टॉकिस्ट / वितरकांचे तपशील देण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरुन हे औषध मिळण्यात सहजता यावी. ड्रग्ज इन्स्पेटक्टर आणि इतर अधिकाऱ्यांना साठे पडताळणीचे आदेश दिले गेले आहेत. तसेच त्याच्या काळ्याबाजारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. 

आगामी काळात रेमेडीसिव्हिर इंजेक्शनच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रेमडेशिव्हरचे उत्पादन वाढवण्यासाठी औषधनिर्माण विभाग देशांतर्गत उत्पादकांशी संपर्क साधत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचा वापर मतांच्या राजकारणासाठीचं, निवडणुक जवळ आली पाणीप्रश्‍न पेटला; स्थानिक नेत्यांकडून जनतेच्या समस्यांना केराची टोपली

Charlie Kirk: ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्येप्रकरणी एफबीआयने संशयिताला ताब्यात घेतले

IPS Anjana Krishna : 'IPS अंजना कृष्णा यांना दिली खोटी माहिती'; कुर्डूत 200 ट्रक वाळूचा दावा ठरला फोल, महसूल अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Latest Marathi News Updates : शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT