work from home handle home work and health 
देश

Work From Home : सरकारचा मोठा खुलासा

नामदेव कुंभार

जवळपास दीड वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी देशभरात लॉकडाउन लावण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना Work From Home चा पर्याय दिला. या कालावधीत सोशल मीडियावर Work From Home बाबतच्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. यामध्ये सरकार Work From Home सुरु करणार असल्याचा दावा केला जात आहे. यावरच माहिती प्रसारण मंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे.

सरकारकडून Work From Home ची कोणतीही योजना आणलेली नाही. धोकादायक लिंकपासून सावध राहा, असा निर्वाणीचा इशारा पीआयबीने (PIB) दिला आहे. सरकारकडून करण्यात येणाऱ्या घोषणा मंत्रालय आणि विविध विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन केल्या जातात. तसेच सोशल मीडियाच्या अधिकृत खात्यावरुनही घोषणा होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही व्हायरल मेसेजवर लक्ष देऊ नये, असेही पीआयबीने सांगितलं आहे.

काय आहे व्हायरल मेसेज?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटलेय की, केंद्र सरकार एका संस्थेमार्फत Work From Home ही योजना आणत आहे. 300 रुपयांमध्ये तुम्ही यासाठी नोंदणी करु शकता. नोंदणी झाल्यानंतर 50 रुपये तुम्हाला रिटर्न मिळतील. यामध्ये पाच मिनिटांत पैसे कसं कमवायचं सांगितलं जाईल. तुम्ही घरबसल्या हजारो रुपये कमवू शकता. दिवसाला घरबसल्या 10 हजार रुपये कमवायची संधी.

दरम्यान, यापूर्वीही सोशल मीडियावर असे बरेच उपाय व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवण्याआधी सत्यता पडताळून पाहावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT