Government Investment Scheme  esakal
देश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 'सुकन्या'सह अनेक छोट्या योजनांचे व्याजदर वाढवले; PPF मध्ये बदल नाही

संतोष कानडे

नवी दिल्लीः केंद्र सरकारने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासह अन्य योजनांच्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे. ही वाढ १० ते ३० बीपीएसपर्यंत आहे.

केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांमध्ये यापूर्वीदेखील वाढ केली होती. आता पुन्हा या योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. आज दि. ३० जून रोजी अर्थमंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी यामध्ये सर्वात जास्त वाढ करण्यात आलेली आहे. या योजनेचा व्याजदर ७ टक्क्यांवरुन ७.७ टक्क्यांवर वाढवलेला आहे. सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ करण्यात आलीय. ७.६ टक्क्यांवरुन ८ टक्के वाढ करण्यात आलीय.

यासह ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये ८ टक्क्यांचा व्याजदर वाढवून ८.२ टक्के करण्यात आलेला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी ही वाढ १० ते ३० बीपीएसच्या श्रेणीत असेल.

तसेच पीपीएफ म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी-७.१ टक्के आणि बचत ठेवींवर असलेलं व्याज ४ टक्के कायम ठेवण्यात आलेलं आहे. किसान विकास पत्र १२० महिन्यांऐवजी ११५ महिन्यात मॅच्युअर होईल. तसेच मासिक उत्पन्न योजनेवरील व्याज ०.३ टक्क्यांनी वाढवून ७.४ टक्के करण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत निर्णय जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT