narendra modi 
देश

...तर PM किसान योजनेचे 6000 रुपये परत घेतले जाणार

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: केंद्र सरकार आता सगळ्यात मोठ्या किसान योजनेतील घोटाळ्यानंतर सावध झालं आहे. काही दिवसांपुर्वीच तामिळनाडूतील हा घोटाळा उघडकीस आला होता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या  (PM Kisan samman nidhi Scheme) नावाखाली खोटी अकाउंट काढून मोठा घोटाळा तामिळनाडूत झाला होता. यानंतर सरकारने कठोर पाऊले उचलून पाठवलेल्या अकाउंटवरील पैसे माघारी घेण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत 61 कोटी रुपयांची सरकारने वसुली केली आहे. तसेच ही वसूली आता कडक केली आहे. केंद्र सरकारने इशारा दिला आहे की, जर या योजनेतील पैशांवर हक्क नसताना पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. यातूनही जर काही लोकांनी पैसे काढले असले तरी त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. 

देशातील शेतकऱ्सांठी केंद्र सरकारने  24 फेब्रुवारी 2019 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना  (PM Kisan samman nidhi Scheme) सुरु केली होती. काही दिवसांपुर्वी या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले होतं. तामिळनाडूमध्ये 5 लाख 95 हजार जणांनी या योजनेसाठी बॅंक अकाउंट (Bank Account) सुरु केले होते, त्यातील तब्बल 5 लाख 38 हजार जण बोगस लाभार्थी निघाले आहेत. आता ज्या बॅंकातून शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे पाठवले गेले होते, त्या बॅंकानी आता ते पैसे माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. हे माघारी आलेले सर्व पैसे आता केंद्र सरकारकडे वर्ग केले जात आहेत. आतापर्यंत बॅंकानी 61 कोटी रुपये बॅंकांनी वसूल केले आहेत.

या घोटाळ्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं की, आतापर्यंत 96 कंत्राटावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर काढून टाकले आहे. बोगस अकाउंटला कारणीभूत असणाऱ्या 35 आधिकाऱ्यांविरुध्द विभागीय चौकशी सुरु आहे. तसेच 3 गटविकास आधिकारी आणि 5 साहाय्यक आधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. ह्या सर्वांवर पासवर्डचा दुरुपयोग केल्याचे आरोप आहेत. राज्यातील 13 जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यासह 52 जणांवर एफआयआर दाखल करून अटक केलं आहे.

कसा झाला घोटाळा-
पंतप्रधान मोदींसाठी ही योजना महत्वाची योजना होती. आता या योजनेतच मोठा घोटाळा झाल्याने मोठा धक्का बसला आहे. हा घोटाळा समोर आल्यावर आता राज्य सरकारने चौकशी सुरु केली आहे. यावरून हे समजले आहे की काही भ्रष्ट लोकांनी या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या लोकांचं बुकींग जिल्हातील आधिकाऱ्यांच्या लॉग इन आयडी आणि पासवर्डचा दुरुपयोग केला होता. 

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT