नवी दिल्ली - भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा सत्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेते. 
देश

सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे - पंतप्रधान

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पावरून संभ्रम निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न निरर्थक ठरले असून अर्थसंकल्प उत्तम आहे हे सर्वांना आता कळाले आहे, अशा शब्दांत मोदींनी भाजप खासदारांसमोर अर्थसंकल्पाची प्रशंसा केली.

यंदाच्या संसद अधिवेशनातील आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या संसदीय पक्षाची पहिली बैठक आज झाली. नवनियुक्त अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्पासोबतच दिल्ली विधानसभा निवडणुकीचीही चर्चा या बैठकीत झाली. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांशी संवाद साधताना सांगितले, की आता नक्षलवाद समाप्तीकडे लक्ष राहील. आसाममध्ये बोडो बंडखोरांच्या संघटनेशी झालेल्या कराराचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बोडोलॅन्ड आणि ब्रु हा ऐतिहासिक करार असून यामुळे ईशान्य भारतात शांतता नांदेल. आतापर्यंतच्या सरकारांनी या संवेदनशील मुद्द्याकडे लक्ष दिले नसल्याचाही दावा मोदींनी या वेळी केला.  अर्थसंकल्प जनतेपुढे नेण्याच्या सूचना पक्ष खासदारांना करताना मोदी म्हणाले, की काही जणांचा अर्थसंकल्पाबाबत भ्रम पसरविण्याचा प्रयत्न होता. परंतु, जनतेला वस्तुस्थिती कळाली आहे.  

सूत्रांच्या म्हणण्यानुसार नड्डा यांनी पक्ष खासदारांना निवडणुकीच्या तयारीमध्ये भाग घेण्यास सांगितले. निवडणुकीला चार दिवस असताना वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी खासदारांना सोपविण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT