Sunny Leone
Sunny Leone 
देश

'या' वेळेत दिसणार नाही कंडोमच्या जाहिराती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वाहिन्यांना सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कंडोमची जाहिरात दाखवू नये असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता दिवसा सर्व कुटुंबासोबत टीव्ही बघता येणार आहे.

दूरचित्रवाहिन्यांच्या प्राईम टाईममध्येही दाखवण्यात येणाऱ्या निरोधच्या जाहिरातींमुळे मुलांच्या मनावर दुष्परिणाम होत असल्याची तक्रार शेकडो प्रेक्षकांनी "ऍडर्व्हटायझिंग स्टॅंडर्ड कौंसिल ऑफ इंडिया'कडे केली होती. त्यांनतर सरकारने अॅडव्हायजरी जारी करुन निर्देश दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सनी लिओनीच्या अशाच एक कंडोमच्या जाहीरातीवरुन वाद सुरु झाले होते. शिवाय गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात रस्त्यांवर सनीच्या कंडोमच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या.  त्यावर देखील अनेकांनी आक्षेप देखील घेतला होता. 

कौटुंबिक मालिकांच्या कमर्शियल ब्रेकमध्ये कंडोमच्या जाहिराती सर्रास दाखवल्या जातात. मुलांच्या आवडत्या कार्यक्रमांमध्येही त्या दाखवल्या जातात. त्यामुळे प्रौढ श्रेणीतील या जाहिरातींच्या प्रसारण वेळेबाबत नियमावली करण्याची मागणी ऍडर्व्हटायझिंग कौन्सिलने माहिती आणि प्रसारण खात्याकडे केली होती.

अॅडव्हायजरीमध्ये केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम 1994 अंतर्गत गर्भनिरोधक ब्रँडच्या जाहिराती  करु नये असे सांगितले आहे. या निर्देशाने पालन झाले नाही तर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. वेगवेगळे गर्भनिरोधक ब्रँड आपल्या उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी मोठया प्रमाणात  अश्लिल कंटेट दाखवत असल्याच्या अनेक प्रेक्षकांनी तक्रारी केल्या होत्या. सध्या कलर्सवर सुरू असलेल्या बिग बॉस शो दरम्यान निरोधची जाहिरात प्रसारीत करण्यास शोचा सूत्रधार सलमान खान याने विरोध केला होता. महिला आयोगानेही या जाहिरातींवर आक्षेप घेतला आहे. माहिती आणि प्रसारण खात्यातील मंत्रिगटाच्या समितीपुढे यावर निर्णय घेतला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT