television channels  
देश

Canada-India: दहशतवाद्यांना व्यासपीठ देऊ नका! केंद्राकडून न्यूज चॅनेल्ससाठी गाईडलाईन्स जारी

कार्तिक पुजारी

Govt of India issues an advisory for television channels

नवी दिल्ली- भारत सरकारने न्यूज चॅनेलसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. गुन्हेगारी किंवा दहशवादाशी संबंध असणाऱ्या व्यक्ती किंवा अशा प्रकारच्या संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तीला न्यूज चॅनेलमध्ये न बोलावण्याचे, तसेच अशा व्यक्तींना कसल्याही प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करुन न देणाच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. माहिती आणि प्रचारण मंत्रालयाने यासंदर्भात पत्र जाहीर केले आहे.

दहशतवाद किंवा गुन्हेगारी यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही न्यूज चॅनलनी व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये. कायद्यानुसार बंदी घालण्यात आलेल्या संस्थेशी संबंधित लोकांनाही डिबेटसाठी बोलवण्यात येऊ नये. संविधानाच्या कलम १९(२) मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या वाजवी निर्बंधानुसार हे निर्देश जारी करण्यात आलेत, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.

दहशतवाद पसरवणाऱ्या लोकांना आपले रिपोर्ट किंवा मत/अजेंडा पसरवण्यासाठी न्यूज चॅनेलनी व्यासपीठ देऊ नये, असं केंद्र सरकारने पत्रात म्हटलंय. एका न्यूज चॅनेलने दहशतवादाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि भारत सरकारने बंदी घातलेल्या संस्थेशी संबंधित एका परदेशी व्यक्तीला चर्चेसाठी बोलावलं होतं. त्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.

न्यूज चॅनेलमध्ये चर्चेसाठी आलेल्या व्यक्तीने अनेक वादग्रस्त वक्तव्य केले होते. भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता याबाबत व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे जनमत कलुषित झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

दरम्यान, भारत आणि कॅनडामध्ये संबंध ताणले गेले आहेत. कॅनडातील एका दहशतवाद्याची भारतीय सुरक्षा यंत्रणेने हत्या केल्याचा आरोप पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. त्यानंतर दोन्ही देशातील राजनैतिक संबंध अत्यंत खालावले आहेत. कॅनडातील कट्टरतावादी आणि फुटीरतावादी नेत्यांनी भारता विरोधात अनेक वक्तव्य केली आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT