Coronavirus File photo
देश

केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना; रुग्णसंख्येच्या आधारावर मिळणार लस

खासगी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या कोरोना लसींची किंमत लस उत्पादक कंपनीकडून जाहीर केली जाईल. तसेच १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यासाठी प्राथमिकता (Priority Group) ठरविण्याचा अधिकार राज्यांना असेल.

वृत्तसंस्था

खासगी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या कोरोना लसींची किंमत लस उत्पादक कंपनीकडून जाहीर केली जाईल. तसेच १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यासाठी प्राथमिकता (Priority Group) ठरविण्याचा अधिकार राज्यांना असेल.

नवी दिल्ली : कोरोना लसींच्या खरेदीतून राज्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेच्या नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. यानुसार आता राज्यांना लोकसंख्या आणि कोरोना रुग्णसंख्येच्या आधारावर तसेच लसीकरण मोहिमेची गती लक्षात घेत लसींचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच लसींचे नुकसान होत असेल, तर लस वाटपावर त्याचा परिणाम होईल. २१ जूनपासून या मार्गदर्शक सूचना लागू होणार आहेत. (Govt of India releases revised guidelines for national COVID vaccination program)

सरकारने म्हटले आहे की, खासगी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या कोरोना लसींची किंमत लस उत्पादक कंपनीकडून जाहीर केली जाईल. तसेच १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यासाठी प्राथमिकता (Priority Group) ठरविण्याचा अधिकार राज्यांना असेल. केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या लसींबाबत अगोदरच राज्य सरकारला माहिती दिली जाईल. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यासाठी किती लसींचे वाटप करण्यात आले, याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाला लसींच्या उपलब्धतेबाबतची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे.

केंद्र सरकारने खासगी रुग्णालयात देण्यात येणाऱ्या लसींच्या किंमतीबाबतही निर्देश दिले आहेत. खासगी रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लसींची किंमत लस उत्पादक कंपनी ठरवेल. तसेच नव्याने करण्यात येणाऱ्या बदलांबाबतही रुग्णालयांना अधिकृत माहिती दिली जाईल. निर्धारित किंमतीपेक्षा १५० रुपये जास्त सर्व्हिस चार्ज आकारण्यात येणार आहे. खासगी रुग्णालये यापेक्षा जास्त किंमत आकारत आहेत की नाही, हे पाहणं राज्य सरकारचं काम असेल.

७५ टक्के लसी केंद्र सरकार देणार

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजता देशाला संबोधित करताना लसीकरण मोहिमेतील बदलांची घोषणा केली. राज्यांकडील २५ टक्के लसींची जबाबदारीही केंद्र सरकारकडे असेल. केंद्र सरकार ७५ टक्के लसी खरेदी करून राज्यांना देणार आहे. तसेच खासगी रुग्णालये आपल्या हिश्श्यापैकी २५ टक्के लसी थेट कंपनीतून खरेदी करू शकतात.

(Edited by : Ashish N. Kadam)

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT