देश

Ukraine : गोळीबारात जखमी भारतीय विद्यार्थाचा खर्च भारत सरकार उचलणार

सकाळ डिजिटल टीम

Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धदरम्यान गोळी लागून जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थी हरजोत सिंग याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च भारत सरकार उचलणार आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. दूतावास त्याच्या आरोग्याच्या स्थितीबाबत अपडेट मिळविण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु संघर्ष क्षेत्र असल्याने माहिती मिळवण्यास अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बागची यांनी सांगितले. दरम्यान, आम्ही एका बांगलादेशी नागरिकाला बाहेर काढले असून, नेपाळी नागरिकांकडून बाहेर काढण्यासाठी विनंती प्राप्त झाल्याचे बागची यांनी यावेळी सांगितले. (Indian Student Injured In Ukraine During War)

पूर्वेकडील युक्रेन विशेषत: खारकिव्ह आणि पिसोचिनवर येथील नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी आमचे सर्वाधिक लक्ष असून, यासाठी काही बसेसची सोय करण्यात यश अल्याचे बागची यांनी सांगितले. पिसोचिनमध्ये 900 ते 1000 भारतीय आणि सुमीमध्ये 700 हून अधिक नागरिक अडकले असल्याचे त्यांनी सांगितले.

युक्रेन रशिया युद्धात राजधानी किव्ह धुमसत आहे. याच शहरात गोळीबारात भारतीय विद्यार्थी हरजोतसिंग जखमी झाला. तो दिल्लीतील रहिवासी असून सध्या किव्हमध्ये शिकतोय. सध्या त्याच्यावर किव्हमधील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. पण, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. मला आधीच मदत मिळाली असती तर मी युक्रेनमधून कधीच बाहेर पडलो असतो, असं त्यानं एनडीटीव्हीसोबत बोलताना सांगितलं. (Indian student injured in Ukraine)

'मला आईसाठी जगायचंय' -

मला माझ्या आईसाठी जगायचं आहे, हे शब्द गोळी लागल्यानंतर तोंडातून बाहेर पडले. मला रुग्णालयात नेल्यानंतर काही वेळानं शुद्ध आली. त्यानंतर डॉक्टरांनी घरी व्हिडिओ कॉल करून दिला. तेव्हा माझे वडील ढसाढसा रडत होते. इथले डॉक्टर खूप चांगले आहेत. त्यांनी माझ्यावर खूप चांगले उपचार केले. त्यांच्यामुळेच मी जरा बरा झालो आहे, असंही हरजोत म्हणाला.

दुतावासांना फोन केले पण...

मला किव्हमधून लिव्हला जायचं होतं. त्यासाठी मी भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांना फोन केले. पण कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. मला मदत केली नाही. त्यामुळे आज मला मृत्यूशी संघर्ष करावा लागतोय, असं हरजोत म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT