EPFO esakal
देश

नोकरदार वर्गाला झटका; पीएफच्या व्याजदरात घट

या निर्णयाचा सुमारे पाच कोटी ग्राहकांवर परिणाम होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नवी दिल्ली : केंद्र सरकारने 2021-22 या वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (EPFO) 8.1 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर नोकरदार वर्गाला मोठा झटका बसला आहे. सध्या केंद्राकडून भविष्य निर्वाह निधीच्या बचतीवर 8.5 टक्के व्याज देण्यात येत होते. परंतु, आता यामध्ये घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार दशकांहून अधिक काळातील हा सर्वात कमी व्याजदर असून, या निर्णयाचा सुमारे पाच कोटी ग्राहकांवर परिणाम होणार आहे. (EPFO Interest Rate News )

मार्चच्या सुरुवातीला, EPFO ने 2021-22 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज 8.1 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला होता. 2020-21 मध्ये हा दर 8.5 टक्के होता. शुक्रवारी जारी केलेल्या EPFO ​​आदेशानुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने EPF योजनेच्या प्रत्येक सदस्यासाठी 2021-22 साठी 8.1 टक्के व्याज देण्याचे निश्चित केले होते. तसेच हा प्रस्ताव कामगार मंत्रालयातर्फे अर्थ मंत्रालयाकडे परवानगीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला केंद्राकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार EPFO कडून ​​आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या व्याजदरानुसार कर्मचाऱ्यांच्या बचतीवर व्याज जमा करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

दरम्यान, याआधी सर्वात कमी म्हणजेच 8 टक्के व्याजदर 1977-78 मध्ये देण्यात आले होते. त्यानंतर आता बचतीवर केवळ 8.1 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2015-16 मध्ये व्याजदर 8.8 टक्क्यांनी किंचित जास्त होता. 2013-14 तसेच 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याजदर देण्यात आले होते. जे 2012-13 च्या 8.5 टक्क्यांपेक्षा काही प्रमाणात अधिक होते. तर, हेच व्याज 2011-12 मध्ये 8.25 टक्के इतके होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

म्युच्युअल फंड : आर्थिक उद्दिष्टे आणि लाइफ सायकल फंड

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची उघडीप; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज जारी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत येणार? तोडगा निघण्याची शक्यता!

Friendship Story: रक्ताच्या नात्यांपेक्षाही मैत्री श्रेष्ठ! देश-विदेशातून 54 डॉक्टर मित्र एकवटले; दिवंगत मित्राच्या कुटुंबासाठी 18 लाख जमवले

SCROLL FOR NEXT