Ukraine Esakal
देश

Ukraine : सरकार 'मिशन मोड'वर; भारतीयांचं विमान लवकरच मुंबईत - गोयल

पीयूष गोयल यांनी ट्विटद्वारे दिली माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान काही वेळात भारतात परतणार आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री या भारतीयांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. याबाबत माहितीचं ट्विट त्यांनी काही वेळापूर्वी केलं. (Govt on mission mode says Piyush Goyal due to plane carrying Indians from Ukraine)

गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, युक्रेनमधून सुरक्षितरित्या बाहेर काढलेल्या भारतीयांचं मुंबई विमानतळावर आगमनाची वाट पाहतो आहोत. सरकार सध्या या परिस्थितीत मिशन मोडवर काम करत आहे. भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीयांना घेऊन पहिल्या विमानाने रोमानियाहून दुपारी पहिलं विमान मुंबईसाठी रवाना झालं होतं. हे विमान भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली चुकीची, शरद पवार यांचे मत; सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा

Jayakwadi Dam: जायकवाडीतून क्षमतेच्या दीडपट अधिक विसर्ग; इतिहासात पहिल्यांदाच सोडले तब्बल १४४ टीएमसी पाणी

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Drowning Death: 'मुलाला वाचविताना वडिलांचा बुडून मृत्यू'; नागझरी नदीतील दुर्घटना; मुलगा गंभीर, नेमकं काय घडलं..

Irani Cup 2025: विदर्भ तिसऱ्यांदा इराणी करंडक विजेता; शेष भारत संघाला ९३ धावांनी नमवले, धुलची एकाकी झुंज, अथर्व सामनावीर

SCROLL FOR NEXT