Aadhaar card  Sakal
देश

Aadhaar Biometric : 'आधार' जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी; सरकारने फेटाळला 'मूडीज'चा दावा

रोहित कणसे

'मूडीज'ने आधारवर उपस्थित केलेला प्रश्न केंद्र सरकारने फेटाळून लावला आहेत. सरकार म्हणणे आहे की, आधार ही जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी आहे, ज्याला गेल्या दशकात 1 अब्जाहून अधिक भारतीयांनी त्यावर विश्वास दाखवला आहे. तसचे भारतीय नागरिकांनी 100 अब्ज वेळा आधारप वापरून स्वतःला व्हेरिफाय देखील केलं असून बहुतेक भारतीय त्याचा वापर करत आहेत.

रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेंटर्सनी आधारच्या बायोमेट्रिक्सच्या विश्वासार्हतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मूडीजने आपल्या अहवालात दावा केला आहे की, आधार प्रणालीतील त्रुटींमुळे, हवामान गरम असलेल्या ठिकाणी आधार बायोमेट्रिक्स काम करत नाही.मात्र केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयाने हा रिपोर्ट निराधार असल्याचे म्हटले आहे.

सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका रिपोर्टमध्ये जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी आधारच्या विरोधात अनेक दावे करण्यात आले आहेत. मात्र, सादर केलेल्या रिपोर्टमध्य डेटा किंवा संशोधनाचा उल्लेख केलेला नाही. तसेच वस्तुस्थिती जाणून घेण्याचा देखील कोणताही प्रयत्न झालेला नाही.

सरकारने जारी केलेल्या या निवेदनात माहिती देण्यात आली आहे की, रिपोर्टमध्ये आधार क्रमांकाची माहितीही चुकीची देण्यात आली आहे. रिपोर्टमधील एकमेव संदर्भ UIDAI च्या वेबसाइटचा आहे. मात्र रिपोर्टमध्ये चुकीच्या पद्धतीने जारी केलेल्या आधारांची संख्या 1.2 अब्ज सांगण्यात आली आहे. मात्र, वेबसाइटवर ठळकपणे जारी केलेल्या आधार बाबत अपडेटेड माहिती दिली जाते.

मूडीजच्या रिपोर्टमध्ये बायोमेट्रिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भारतातील उष्ण, दमट हवामानात कामगारांना सेवा नाकारल्या जात आहेत असा दावा करण्यात आला. दरम्यान हा दावा भारताच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGS) संदर्भात आहे.

याबाबत सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रिपोर्टच्या लेखकांना माहिती नाही की, मनरेगा डेटाबेसमध्ये आधारचे सीडिंग कामगारांना त्यांचे बायोमेट्रिक्स वापरून प्रमाणीकरण करण्याच्या आवश्यकतेशिवाय करण्यात आले आहे. तसेच योजनेअंतर्गत मोबदल्याचे वितरण हे थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करून केले जाते. तसेच यासाठी कामगारांना त्यांचे बायोमेट्रिक्स वापरून ऑथेंटिकेशन करण्याची आवश्यकता नाही.

आधार प्रणालीमध्ये सुरक्षा आणि गोपनीयतेशी संबंधित असुरक्षितता असल्याचे मूडीजच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या संदर्भातील वस्तुस्थिती संसदेते विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरात वारंवार स्पष्ट केली गेली आहे, जिथे आजपर्यंत आधार डेटाबेसमध्ये चोरी झाल्याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. तसेच सरकारने आधारबाबत एक मजबूत गोपनीयता प्रणाली तयार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT