Govt set target of 1 lakh Covid-19 test daily until May 31
Govt set target of 1 lakh Covid-19 test daily until May 31 
देश

Coronavirus : 'या' तारखेपासून भारतात होणार रोज एक लाख टेस्ट; आरोग्यमंत्री

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या लढाईत भारताने स्वत: टेस्टींग किट बनवण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली त्यानंतर एका दिवसात आपल्याला एक लाख चाचण्या करता येतील असेही त्यांनी सांगितले. 'मे महिन्यापर्यंत भारतात आरटी-पीसीआर, किटची चाचणी करण्यात आपण यशस्वी होऊ. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची परवानगी मिळाल्यानंतरच उत्पादन सुरू होईल. 31 मे पर्यंत देशात दररोज एक लाख चाचण्या होतील, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.

कोरोनाच्या तपासणीसाठी चीनकडून आणण्यात आलेली चाचणी किट खराब दर्जाचे निघाले. यानंतर भारताने स्वतः किट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. बायो टेक्नॉलॉजी विभागासह इतर संघटनांशी चर्चेनंतर डॉ. हर्षवर्धन यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, आमच्या शास्त्रज्ञ, बायोटेक्नॉलॉजी तज्ञांनीही ही लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या व्यतिरिक्त, अनुवांशिक अनुक्रमांवर अभ्यास देखील सुरू झाला आहे.

संतांच्या हत्यावरून ट्विटरवॉर; योगींचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर

महत्त्वाचं म्हणजे कोरोना विषाणूची ओळख पटविण्यासाठी चाचणी घेणे खूप महत्वाचे आहे. सध्या भारतात दररोज 40 ते 50 हजार चाचण्या घेतल्या जातात, त्याची क्षमताही सतत वाढविली जात आहे. मंगळवारी सकाळपर्यंत देशात 7 लाखाहून अधिक कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT