देश

गायब होणारे सरपंच व त्यांचे कार्यकर्त्यांचे दर्शन अचानक ग्रामस्थांना होऊ लागले

सकाळन्यूजनेटवर्क

प्रयागराज - उत्तर प्रदेशमधील सरपंचांचा कालावधी येत्या २५ रोजी संपुष्टात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकांविषयी सर्वांचे लक्ष लागले असून विद्यमान व भावी सरपंचांनी मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्न सुरू केले आहेत. 

निवडणूक झाल्यावर पाच वर्षे जणू चंद्रावर गायब होणारे सरपंच व त्यांचे कार्यकर्त्यांचे दर्शन अचानक ग्रामस्थांना होऊ लागले आहे. निवडणुकीवर लक्ष ठेवून पाच वर्षांत केलेल्या कामांचा आढावा घेण्यास स्थानिक नेत्यांनी सुरुवात केली आहे. सध्या लग्नसराईचा काळ असला तरी कोरोनामुळे वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा असल्याने विवाह साधेपणाने होत आहेत, तरी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार त्यांच्या पंचक्रोशीत होणाऱ्या कोणत्याही विवाहाला हजेरी लावत असल्याचे चित्र आहे. 

पाच वर्षांत कधीही मतदाराच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सुख-दुःख न जाणणारे पुढारी मतांसाठी गावातील प्रत्येक घराला भेट देत आहेत. ज्येष्ठांना पाहून रस्ता बदलणारे कार्यकर्ते आता ५० मीटर लांबूनही झुकून पाया पडत आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गल्लीबोळांत फलकांची गर्दी 
राज्यात ग्रामपंचायत निवडणूक फेब्रुवारी किंवा मे महिन्यात होणार हे अद्याप जाहीर झाले नसले तरी गावांमधील सर्व गल्ली-बोळ सरपंचपदाच्या उमेदवारांच्या फलकांनी सजले आहे. ‘वादा नही विकास करेंगे, साथ दीजिए काम करेंगे,’ किंवा सेवक और जनता का दुलारा’, अशा आकर्षक शब्दांची पखरण या फलकांवर केलेली दिसत आहे. मजेची गोष्ट म्हणजे पन्नाशीचे लोकही स्वतःला युवा उमेदवाराच्या रूपात सादर करीत आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT