great indian jugaad to sterilise vegetables video viral 
देश

Video: भाज्या सॅनिटाइझर करणारे इंडियन जुगाड

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसच्या काळात कोणतीही वस्तू स्वच्छ करण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतली आहे. यामध्ये हात असो वा पालेभाज्या. हात सॅनिटाइझरलने स्वच्छ केला जातो. पण, भाज्या सॅनिटाइझर करण्यासाठी एका व्यक्तीने शोध लावला आहे. इंडियन जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोरोनाच्या काळात आपण हातांप्रमाणे वस्तू सॅनिटाइझ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करतो. मात्र, फळं-भाज्यांसाठी हे सॅनिटायझर वापरू शकत नाही. त्यामुळे आपण गरम पाण्यात भाज्या धुवून घेतो. मात्र, यावरही एका व्यक्तीने जुगाड शोधून काढले आहे. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्वीटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'भाज्या निर्जंतुक करण्यासाठी मस्त इंडियन जुगाड आहे. ही पद्धत किती प्रभावी ठरेल हे मी सांगू शकत नाही. मात्र भारत खरंच अद्भूत आहे", असे ट्वीट साहू यांनी केले आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, प्रेशर कुकरच्या शिट्टीवर एक रबरी पाइप लावला आहे. पाइपचे दुसरे टोक संबंधित व्यक्तीच्या हातात आहे. त्यांनी ताटात भाज्या आणि फळे ठेवली आहेत. कुकरची शिट्टी सुरू झाल्यानंतर त्यातून निघणारी वाफ ही फळे आणि भाज्यांवर सोडली जाते. यामुळे भाज्या निर्जंतुक होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काही जणांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. तर काही जणांनी कुकरच्या वाफेने अशा भाज्या अशा सॅनिटाइझ करणे धोक्याचं ठरू शकते, गंभीर दुखापत होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय, काही जणांनी ही पद्धत व्हायरसचा नाश करण्यासाठी पुरेशी नाही, असेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT