GHMC 
देश

Hyderabad Election : टीआरएस-भाजपामध्ये चुरशीची लढत; AIMIM ला तिसऱ्या स्थानी ढकललं

सकाळवृत्तसेवा

हैद्राबाद : ओवैसी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हैद्राबादमध्ये भाजपाने आघाडी घेतलेली दिसून येत आहे. ग्रेटर हैद्राबाद नगर निगम निवडणुकीच्या 150 जागांवर सध्या मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीतील आकडेवारीनुसार, सुरूवातीला आलेल्या कलांमध्ये भाजपानं 87 जागांवर आघाडी घेतली होती. परंतु आता भाजपा पिछाडीवर गेलेले आहे. सध्या टीआरएस हा पक्ष आघाडीवर आहे. टीआरएसननं 65 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा सध्या 41 जागांवर पुढे आहे. तर असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम ३२ जागांवर आघाडीवर आहे. भाजपानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

मात्र, AIMIM या पक्षाहून भाजपाने मुसंडी मारली  आहे. सध्या भाजप AIMIM हून अधिक जागांवर पुढे आहे. तर सत्ताधारी पक्ष टीआरएस प्रथम क्रमांकावर पुढे आहे. हैद्राबादमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा ओवैसी यांचा पक्ष सध्या 32 जागांवरील आघाडीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपाने या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावत जोर लावला होता. त्याचा भाजपला फायदा होताना दिसतोय. 2016 मधील निवडणुकीत भाजपच्या युतीला फक्त 5 जागा मिळाल्या  होत्या. 

या निवडणुकीत सर्वच पक्षांनी जोरदार ताकद लावली होती. मात्र, भाजपने ही निवडणूक अगदी मोठी निवडणूक असल्याप्रमाणे तगडे खेळाडू मैदानात उतरवले होते. तेजस्वी सूर्या, स्मृती इराणी या आक्रमक नेत्यांचा तसंच प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हैदराबादचा दौरा केला होता. गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मोठ्या नेते या प्रचारसभेत उतरले होते. मात्र, या निवडणुकीत कोण बाजी मारेल, हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PWD Engineer Assault : भाजप नेता अन् PWD इंजिनिअरची तूफान हाणामारी, चेहऱ्याला चिखलही फासला; लोक भांडण सोडवायला आले पण... VIDEO VIRAL

लोकांना पॉर्न दाखवून युक्रेन लढणार युद्ध, २३६ कोटींच्या कमाईतून ३० हजार ड्रोन खरेदी करता येणार; झेलेन्स्की मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Marathi News Live Updates : केदारनाथ यात्रेदरम्यान दगड अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू , शेकडो यात्रेकरू अडकले

IND vs PAK: वर्ल्ड कप नाही, आशिया कपही नाही... तरी भारत-पाकिस्तान भिडणार? ICC घेणार ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे प्लॅन

ठाण्यात हिट अँड रनचा थरार! चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सिलेटरवर पाय, ३-४ वाहनांना उडवत पादचारी महिलेला चिरडलं; एकाचा मृत्यू, दोन जखमी

SCROLL FOR NEXT