Aadhar Card Wedding Invitation 
देश

वाढीव! नवरदेवाने लग्नासाठी छापली आधारकार्डवाली निमंत्रण पत्रिका

सकाळ डिजिटल टीम

Aadhar Card Wedding Invitation: आपले लग्न अविस्मरणीय व्हावे, यासाठी प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करत असतात. आज-काल कित्येक जण आपल्या लग्नामध्ये काही ना काही हटके गोष्ट करतात आणि त्याचे व्हिडिओ, फोटो नेहमी सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. लग्नामध्ये आजकाल पाहुण्यांना निमंत्रण पाठविण्यासाठी सध्या हटके पत्रिका तयार केल्या जातात. सध्या असेच एका लग्नाचे निंमत्रण पत्रिका खूप चर्चेत आहे.

एका जोडप्याने आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसाठी आधार कार्डची थीम निवडली आहे. लोकांना ही आधार कार्डवाली लग्न पत्रिका फार आवडली आहे. आधार कार्डवाल्या लग्न पत्रिकेवर लग्नाची सविस्तर माहिती क्रिएटिव्हली मांडली आहे. कार्डमध्ये आधार नंबरच्या ऐवजी लग्नाची तारीख लिहिली आहे तसेच त्यासोबत बारकोड देखील दिला आहे.

Aadhar Card Wedding Invitation

सोशल मिडियावर कार्ड खूप व्हायरल होत आहे. लोकांनी ही क्रिएटिव्ह आयडिया प्रचंड आवडली आहे. ही पत्रिका छत्तीसगडमधील जशपूरमध्ये जिल्ह्याच्या फरसाबहार ब्लॉक अंकिरा गावातील रहिवासी असलेल्या लोहीत सिहं नावाच्या तरुणाची आहे. त्याने डिजिटल पत्रिका तयार केली आहे. लोहित सिंह हा अंकिरा गावातील लोक सेवा केंद्राचे काम पाहतो. लोक सेवा केंद्रामध्ये लोक आधार कार्ड बनवितात. त्यासोबतच इंटनेट, प्रिटिंह, फोटो कॉपी आणि लग्नाचे आधार कार्ड छपाई संबधीत काम तो पाहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT