supreme court 
देश

‘जीएसटी’चा उद्देशच नष्ट : सर्वोच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायदा हा नागरिकांना सोयीचा आणि त्यांच्या भल्यासाठी असेल, या उद्देशाने संसदेत मंजूर करण्यात आला होत. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याची पद्धत पाहता तो उद्देशच नष्ट होत आहे, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने आज केली. प्रत्येक उद्योगपती धोकेबाज असतो, असेही कोणी म्हणू शकत नाही, असे न्यायालयाने बजावले. 

हिमाचल प्रदेश जीएसटी कायद्यातील एका तरतूदीला सर्वोच्च न्यायालया आव्हान देण्यात आले असून त्यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने ही प्रतिक्रिया दिली. कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करताना न्या. धनंजय चंद्रचूड म्हणाले की, जनतेला कर भरणे सोयीचे जावे अशी संसदेची अपेक्षा होती. मात्र, ज्या पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी केली जात आहे, ते पाहता कायद्याचा उद्देश नष्ट होत आहे.

जीएसटी भरणा बाकी असल्यास प्राप्तीकर विभाग संबंधित व्यापाऱ्याच्या बँक खात्यासह इतर संपत्तीवर टाच आणू शकतो, असे वादग्रस्त तरतूदीत म्हटले आहे. या तरतूदीला आव्हान देण्यात आले आहे. यावर नाराजी व्यक्त करताना न्यायालयाने, प्रत्येक व्यापाऱ्याला धोकेबाज म्हणता येणार नाही, असे म्हटले. या प्रकरणी न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CEC ज्ञानेश कुमार प्रकरणात मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका; 10 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : संविधान दिनानिमित्त नागपुरात 'संविधान बचाव' रॅली; कॉक्रोच जनता पार्टीचा पुढाकार

Kudu Marathi Film: चिमण्यांच्या घरट्यासाठी ३५ दिवस ‘वीज बंद’; सत्यघटनेवर आधारित ‘कुडू’ला प्रतिसाद; पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा अधोरेखित

Indian Cricket: बुमराचा गोलंदाजीचा अंदाज सचिनलाही आला नव्हता, माजी प्रशिक्षक जॉन राईट यांनी उघडला जसप्रीतच्या प्रवासाचा मार्ग

तेल टँकर उलटल्यानंतर आगीचा भडका, ३१ जणांचा होरपळून मृत्यू; २५ पेक्षा जास्त गाड्या जळून खाक, अनेकजण जखमी

SCROLL FOR NEXT